(होणार सून मी या घरची- पहा लग्नाचा अल्बम )
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका होणार सून मी ह्या घरची मधील सरू मावशीचं लग्न पुढच्या आठवड्यात बघायला मिळणार असून तिचा जुना मित्र प्रद्युम्न उर्फ पप्पुशी हे लग्न होणार आहे. पप्पु काही वर्षांपूर्वी सरू मावशीला बघायला आलेला असतो परंतू त्याच्या घरातील लोकांचा स्वभाव न पटल्यामुळे लग्नाची बोलणी पुढे सरकत नाही. आता अनेक वर्षांनंतर पप्पू जेव्हा जान्हवीला भेटतो तेव्हा सरूचं अजून लग्न झालेलं नसल्याचं त्याला कळतं. दरम्यान पप्पुलाही मनासारखी जोडीदार न मिळाल्याने त्याचंही लग्न झालेलं नाहीये यामुळे पप्पू परत एकदा सरूशी लग्न करण्याची इच्छा जान्हवीकडे बोलून दाखवतो आणि श्री आणि जान्हवी हे लग्न करण्याचा घाट घालतात. गोखले कुटुंबात या लग्नावरून विरोध असला तरी श्री आणि जान्हवी सरू मावशीच्या आनंदासाठी घरच्यांची संमती मिळवण्यात यशस्वी होतात आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडतं. येत्या आठवड्यात सरू मावशीच्या लग्नाचा हा भाग बघायला मिळणार आहे. अभिनेता समीर चौगुलेने पप्पूची ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
लग्नाचा अल्बम





























