पुणे,: घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट्स एलएलपी. हा संजय घोडावत ग्रुपचा FMCG विभाग या उद्योगातील झपाट्याने वाढणारा ब्रँड आहे. त्यांनी भारतीय ग्राहकांसाठी स्नॅक्स मधील नवीन उत्पादन श्रेणी आणली आहे . कंपनीने स्नॅक्स फुड ची एक नवीन श्रेणी PO! या नावाने सुरु केली आहे. या नवीन श्रेणी मध्ये पोटॅटो चिप्स , स्टिकीज (Corn extruded snacks) आणि Thinlets (Potato sticks) यांचा समावेश आहे
PO! च्यामाध्यमातून भारतीय ग्राहकाला विदेशी चवीचे स्नॅक्स सुयोग्य किमतीत विकत घेता येणार आहेत. या उत्पादनांचा मुख्य उद्देश म्हणजे परवडणार्या दरात भारतीय ग्राहकाला उच्च दर्जाचे उत्पादन देणे असा आहे. यानवीन उत्पादनांतून शहरी आणि निम-शहरी भागातील तरुण पिढीला केंद्रित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारतीय ग्राहकाला रुचेल असे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चवींचे केलेले सुयोग्य मिश्रण अशी हि उत्पादने असणार आहेत. PO! द्वारे ग्राहकाला एक विशेष आणि विस्तृत श्रेणी अनुभवायला मिळणार आहे, इटालियन फूड प्रेमींसाठी पिझ्झा फ्लेवर, मेक्सिकन फूड प्रेमींसाठी जॅलपेनो फ्लेवर तसेच इस्टर्न टॅंगो ज्युसी चवी साठी थाईस्वीट चिली अशा प्रकारच्या अनेक चवी उपलब्ध करण्यात आले आहे.
सामान्य भारतीय ग्राहकांना रुचेल अशी उत्पादनांची विस्तृत श्रेणी असणार आहे.या विस्तृत श्रेणीची सुरुवात रु.१० प्रती पॅक पासून आहे.
संजय घोडावत ग्रुपचे संचालक – श्रेणिक घोडावत यावेळी बोलताना म्हणाले, “भारतात असणाऱ्या याक्षेत्रातील प्रमुख कंपनींचे सध्या ३ते४ चफ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत, हि तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने आमची उत्पादने सुरुकरण्यात आलेली आहेत. अपुऱ्या range मुळे ग्राहक इम्पोर्टेड उत्पादनांक डेवळतो जो कि भारतीय उत्पादनां पेक्षा तुलेनेने जास्त आहे. PO! च्यामाध्यमातून आम्ही एक विशेष श्रेणी सुरु करीत आहोत ज्यात जगभरातील विविध फ्लेवर्स असतील.”
ही नवीन उत्पादन श्रेणी भारतीय ग्राहकांशी आणि बाजारपेठेशी असणारी आमची बांधिलकी दर्शवते. ही नवीन श्रेणी ग्राहकांना नवीनच व आणि अनुभव देईल अशी मला विश्वास आहे. खूप संशोधन करून हे फ्लेवर्स तयार करण्यात आले आहेत आणि आम्हाला खात्री आहे कि भारतीय बाजारपेठेत आमच्या यानवीन प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल व या फूडक्रांती ची या उद्योगात प्रशंसा होइल.
कंपनीने नाविन्यपूर्ण अशा packaging च्या सहाय्याने या नवीन श्रेणी तून एकक्रांती याउद्योगक्षेत्रात आणली आहे. PO ! ची सर्व उत्पादने आकर्षक अशा पॅक मध्ये असणार आहेत. जास्तीतजास्त विदेशी फ्लेवर्स स्नॅक्स मध्ये आणून ग्राहकाला आंतरराष्ट्रीय फ्लेवर्स भारतीयदरात देणे संजय घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट चे ध्येय आहे.
Ghodawat consumer products बद्दल
विविध क्षेत्रात कामकरणाऱ्या कोल्हापूर, महाराष्ट्र स्थित संजय घोडावत ग्रुपच्या FMCG अंतर्गत घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट हा विभाग आहे. ‘स्टार’ या नावाने घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट ने ग्राहक उत्पादन क्षेत्रात सुरुवात केली. ‘स्टार’ या नावाला साभाविक आणि प्रचंड प्रमाणात भारतीय निमशहरी आणि ग्रामीण बाजारात प्रतिसाद मिळाला. गाठीशी असणारा अनुभव, विचारक्षमता, देवाण-घेवाण साधने आणि नेटवर्कच्या साहाय्याने इतरांना जे अशक्य झाले तेथे ग्रुप पोहचू शकला.स्टार हा आज च्याघडीतील कन्झ्युमर प्रॉडक्ट मधील महत्वाचा ब्रँड बनला आहे तसेच ग्राहक निष्ठा आणि मागणी अनुभवत आहे. जागतिक पातळीवर सर्वात मोठा कन्झ्युमर ब्रँड बनण्याचे ध्येय घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्ट हे तीव्र वृद्धीच्या मार्गावर आहे.