मुंबई- शिवसेना- भाजपचा 25 वर्षांपासूनचा घरोबा -मैत्री जी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी कायम जतन केली होती ती अमित शहा यांच्या भाजप अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत घटस्थापनेच्या दिवशीच आज गुरुवारी सायंकाळी अखेर तुटली. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन – गोपीनाथ मुंडे यांनी सेना आणि भाजपची 1989 मध्ये युती केली होती. अखेर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपने घटस्फोट घेतला.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला आणि ठाकरे यांना हिरवा कंदील दाखवायचाच नाही यावरून हि ताणाताणी अखेर तुटली .
शिवसेना – भाजपची युती संपुष्टात आल्याची माहीती भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. खडसे म्हणाले, भाजपला मुख्यमंत्रीपद हवे, असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आम्ही ११९ जागा पहिल्यापासून लढवत होतोच, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आता काय करायचे असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.असे ते म्हणाले
दरम्यान युती तोडण्याचा निर्णय मुंबईतून नव्हे तर आतापर्यंत स्पष्ट झाले आहे . अमित सहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला तेव्हा प्रत्येक भाषणात ‘ महाराष्ट्रात सरकार भाजपचे येईल असे सेना – ठाकरे आणि महायुतीचा उल्लेख जाणूनबुजून टाळला, तेव्हाच हि युती तुटल्याच चित्र निर्माण झाले होते . पण काही महाराष्ट्रातील दिल्लीत बसलेल्या नेत्यांनी युती तोडणे चांगले नाही असा सल्ला दिल्लीश्वरांना दिला आणि चर्चा होत राहिली अखेर घटस्थापनेच्या दिवशी याबाबत अधिकृत घोषणा झाली