पुणे- ग्रामीण भागातील अविनाश राहाणे आणि अमर साबळे हे दोन पत्रकार पुढारी झाले(अर्थात ते ‘पुढारी’दैनिकात हि होतेच . ) आणि पाहता पाहता त्यांनी कधी राजकारणात भरारी घेतली हे समजले देखील नाही आता साबळे यांना चक्क खासदारकी मिळाली आहे त्यामागे त्यांची पक्षनिष्ठा हि तेवढीच महत्वाची आहे हे हि नमूद करावे लागेल -कधी काळी बारामतीचा पत्रकार म्हणून ओळख असलेले अमर साबळे आता खासदार झाले आहेत . केवळ पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात अथवा नेतृत्व करता येते, असे नाही. तसे असते, तर माझ्यासारखा कार्यकर्ता “खासदार‘ होऊ शकला नसता, असे सांगून साबळे म्हणाले “आजवर कुठेही मी “बायोडेटा‘ दिला नाही. सतत निष्ठेने, श्रद्धेने काम करत राहिलो. भाजपच्या विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यामुळेच न मागता आज मला हे सर्वोच्च पद मिळाले. हा खरेतर, सामाजिक समतेचा आविष्कार म्हणावा लागेल,‘‘ शोषित, पीडित, दलित आणि तळागाळातील सर्व समाज घटकांच्या भल्यासाठी आपण झटून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “”वीस वर्षे बारामतीत पत्रकारिता केल्यानंतर सामाजिक जीवनाची सुरवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामाजिक समरसता मंचमध्ये काम केले. भिकुजी इदाते, दामुअण्णा दाते आणि मुकुंदराव फणसेकर यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. मला घडवले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालो. त्यांच्या दोन लोकसभा, तीन विधानसभा अशा पाच निवडणुकांचे व्यवस्थापन पाहिले. त्यामुळे २००९ मध्ये “पिंपरी‘मधून (राखीव) संधी मिळाली. पण थोडक्यात हुकली. या वेळी २०१४ मध्ये संधी मिळाली होती. आयत्यावेळी ती जागा रिपाइंला सोडण्यात आल्याने, पक्षादेश मानून माघार घेतली. नंतरही न खचता प्रदेश भाजपमध्ये मागासवर्गीय सेलमध्ये झोकून काम केले. त्यामुळेच न मागता ही संधी मिळाली.‘‘
पिंपरी-चिंचवड शहरात खूप काही काम करू शकतो. शहराला तिसरा आणि भाजपला पहिलाच खासदार मिळणार असल्याने ताकद वाढणार आहे. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यालाही न्याय मिळू शकतो, हे दिसले.