नवी दिल्ली -गो हत्या बंदीचा कायदा राज्यात लवकरच लागू होणार असून आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी करून संमती दिली आहे.
युती सरकारच्या काळात १९९५ साली गोवंश हत्या बंदीचा कायदा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला होता. पण केंद्राने काही त्रूटी काढून सुधारणांसाठी विधेयक राज्यात पाठवले होते. गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारनं याविषयी कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार याविषयी गंभीर असल्याने विधेयकातील त्रूटी दूर करून ते केंद्राकडे पाठवण्यात आले. आता हा कायदा लवकरच महाराष्ट्रात लागू होईल, अशी प्रतिक्रिया किरट सोमय्या यांनी दिली.
सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कायद्यात आवश्यक ते बदल करून राज्य सरकाराने हे विधेयक केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले. त्यानंतर केंद्राने मंजूरी देत हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले. गोवंश हत्या बंदी विधेयक महाराष्ट्रात लागू व्हावे, यासाठी खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, अनिल शिरोळे, कपिल पाटील, संजय धोत्रे, नाना पटोले यांनी निवेदन सादर केले. त्यानंतर आज राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली.