पुणे- नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केला. या कायद्याची मागणी वारकर्यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. काँग्रेस शासनाच्या काळात मुंबई–नागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चे, जेल भरो आंदोलन, मुख्यमंत्री–उपमुख्यमं
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात हजारो कत्तलखाने काढून दरवर्षी कोट्यवधी देशी गायींची कत्तल होत आहे. देशी गोवंश नष्ट केला जात आहे. देश वाचावा, अशी वारकर्यांची भूमिका आहे. गाय, बैल वाचविले, तर शेती आणि शेतकरी वाचेल आणि देश वाचेल. अस्सल देशी गायीपासून पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेले गोमूत्र, शेणापासून यार केलेले पंचगव्य, गोवर्या, तसेच दुध, दही, तूप मिळते. या सर्व गोष्टी हिंदु धर्मांत पवित्र मानल्या आहेत. यामुळे गीता, गंगा आणि गाय यांचे रक्षण झाले पाहिजे. स्वत:भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायीच्या सेवेसाठी या देशात अवतार घेतला आहे.
राज्यात गोपालन करणार्या अनेक संघटना आणि गोप्रेमी व्यक्ती आहेत. शासनाने त्यांना सर्व सहकार्य करावे. गायी सांभाळणार्यांना आर्थिक साहाय्य करावे. गोशाळांसाठी वनखात्याच्या उपलब्ध असलेल्या जमिनी द्याव्यात. गायीचे अनन्यसाधारण महत्त्व शेतकर्यांना लक्षात यावे, यासाठी एक शासकीय समिती स्थापन करून राज्यभर शिबिरे घ्यावीत. ज्याप्रमाणे सांस्कृतिक मंत्रालय आहे, कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री आहे, तसेच गोसंवर्धन खाते तयार करावे आणि राजस्थानच्या धर्तीवर गोसंवर्धन मंत्री नेमावा, अशा आमच्या मागण्या आहेत. त्याचा शासनाने विचार करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.