पुणे-.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदी निवडीबद्दल नागरिकानी परस्पराना मिठाई भरवुन आनंद व्यक्त केला.या वेळी भाजप चे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,माजी नगरसेवक दिलिप उंबरकर,राजाभाउ पाटील,ओ.बी.सी.आघाडीचे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड,युवा मोर्चा चे चिट्णीस पवीत सहानी,प्रकाश पाटील,शीख जनसेवा संघाचे चरणजीत सहानी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी बोलताना संदीप खर्डेकर म्हणाले ” देशात नरेंद्र-राज्यात देवेंद्र ही घोषणा कशी वाटते…? यावर स्मितहास्य करत “चांगली घोषणा आहे” असे म्हणनारे दिलदार लोकनेते कै.गोपीनाथजी मुंडे यांच्याच आशिर्वादाने आज देवेंद्रजींसारखे तरुण.तडफदार,कर्तुत्ववान मुख्यमंत्री महराष्ट्राला लाभले असुन ते निश्चितच राज्याला विकासाकडे नेतील व देशातील एक नंबरचे राज्य बनवुन महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करतील असा विश्वास ही संदीप खर्डेकर यानी व्यक्त केला.
या वेळी फ्लेक्स लावुन शहराचे सौंदर्य न बिघडवता सामाजिक कार्यासाठी निधी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागल्याने शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी पेढे वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. शहरातील भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यक र्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीचे स्वागत केले.
शहरातील शनिवार, कसबा, नारायण पेठ, पर्वती, तसेच उपनगरांमधील कोथरूड, वारजे, येरवडा, खडकी येथेही मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आले. दिवाळी झाल्यानंतरदेखील भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे स्वागत कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात केले.