गुणदायी ;परवडणाऱ्या औषधांचे संशोधन आवश्यक – आबेदा इनामदार
इमर्जिंग ट्रेंन्डस इन फार्मसी राष्ट्रीय कार्यशाळा
पुणे :
विविध रोगांना होण्याआधी रोखण्यासाठी संशोधन जसे आवश्यक आहे, तसेच गुणदायी तरीही परवडणाऱ्या औषधांवर संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत आबेदा इनामदार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) यांनी व्यक्त केले.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ च्या सहकार्याने आझम कॅम्पसच्या पीएआय हायटेक सभागृहात येथे झालेल्या “इर्मजिंग ट्रेडस् इन फार्माक्युटिकल आर ऍण्ड डि ऍण्ड ड्रग डिसकव्हरी’या विषयावरच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रा. इरफान शेख अध्यक्षस्थानी होते.
आबेदा इनामदार म्हणाल्या, “मानवी प्रयत्न हे रोगांचा अटकाव करण्याकडे आहेत. रोग होऊ नये ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रोग झाला तर बचाव करण्याचे, उपचाराचे कमी वेळेत असरकारक औषधांवर संशोधनाचा भर हवा.’
प्रा. इरफान शेख म्हणाले, “मानवी जीवन उन्नत आणि समाधानी होण्यासाठी फार्मा कंपन्यांनी संशोधनाचा वापर करावा.नवे प्रयोग समोर येण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या ठरतात. ‘
डॉ. वंदना पत्रावळे, डॉ. मरीयम रेघागी, डॉ. प्रल्हाद वांगीकर, डॉ. नसरीन शेख, डॉ. पद्मा देवराजन, डॉ. अमिता कर्णिक, डॉ. के. एस. जैन, डॉ. चंदशेखर राऊत या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने झालेल्या या राष्ट्रीय कार्यशाळेत अनेक संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम उपस्थित होते.