गांधीं च्या टिंगली चे दिवस गेले ,स्मरणा चे आले ,विचारांचे दिवस आले पाहिजेत :कुमार सप्तर्षी
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘गांधी सप्ताह ‘ चे उदघाटन
पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘महात्मा गांधी सप्ताह ‘ चे उद्घाटन आज सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे झाले . गांधी विचारांना उजाळा देताना मान्यवरांची वैचारिक जुगलबंदी रंगली
उपाशी बांधवाना खायला घालायचे कि नाही हा चर्चेचा विषय होण्याऐवजी घरी मांस खावे कि नाही याची चर्चा होते ,विचारवंतांच्या हत्या होताहेत, आपला प्रवास कोणत्या दिशेने होतोय ,असा प्रश्न पडताना स्मशान शांततेतून बाहेर या असे आवाहन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले .
सद्य परिस्थितीत गांधींचे स्मरण ही जोखीम झालीय का ? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी केला ,गांधीं च्या टिंगली चे दिवस गेले ,स्मरणा चे आले ,विचारांचे कधी येणार ? असे डॉ कुमार सप्तर्षी यांनी विचारले ,तर गांधीना टिंगलीचा विषय गांधी टोपी घालून गैर वर्तणूक करणाऱ्यांनी केला आणि धनंजय देसाई ,सनातन म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बजावले
व्यासपीठावर सर्व धर्मीय गुरु ,डॉ विश्वनाथ कराड ,डॉ शिवाजीराव कदम ,अन्वर राजन ,विश्वस्त एम एस जाधव ,माधव रत्नपारखी ,अभय छाजेड होते
उज्वला बर्वे यांनी सूत्र संचालन केले . अन्वर राजन यांनी आभार मानले
गांधी सप्ताहाचे हे ६ वे वर्ष होते .
यावेळी सर्व धर्मीय प्रार्थना झाल्या
अनंत दीक्षित म्हणाले ,’गांधींचे स्मरण हि जोखीम झालीय का ? असा प्रश्न पडत असला गांधी हे शाश्वत सत्याचा शोध घेणारे महामानव होते . देश काळाच्या पलीकडे जाण्याची ताकद त्यांच्यात होती . गांधी माणसाच्या सद सद विवेक बुद्धीला जागृत करीत होते ‘
फादर दिब्रिटो म्हणाले ,’जगाचे नागरिक होताना आपण संकुचित होत जाणे टाळणार का ?
दाभोळकर ,पानसरे ,कलबुर्गी हत्येनंतर आपला प्रवास कोणत्या दिशेने चालला आहे ?
विचार खुंटले जात आहेत ,स्वातंत्र्य नाकारले जात आहे . त्यातून ‘ हे राष्ट्र भेकडांचे आणि भय ग्रस्तांचे,आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य दांभिकतेचे ‘ अशी अवस्था आली आहे . एका हातात धर्म ग्रंथ असला तरी दुसऱ्या हातातील संविधान सुटता कामा नये ‘
गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’ ,गांधीं च्या टिंगली चे दिवस गेले ,स्मरणा चे आले ,विचारांचे आले पाहिजेत . त्यासाठी गांधी सप्ताहाचे प्रयोजन आहे ‘
पालक मंत्री गिरीश बापट म्हणाले ,’गांधीना टिंगलीचा विषय गांधी टोपी घालून गैर वर्तणूक करणाऱ्यांनी केला,गांधीना सोयीस्कर वापरून घेतले गेले आणि धनंजय देसाई ,सनातन म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे . वैचारिक मतभेद झाले तरी टोकाची भूमिका घेता कामा नये. डॉ सप्तर्षी यांच्या विधायक कार्याला मदत करू ‘