नवरात्रीचा सण आपण स्त्रीशक्तीचं प्रतिक म्हणून साजरा करतो. घटस्थापना ते दस-यापर्यंत सर्वत्र धामधूम असते ती देवीच्या जागराची. सुख, समृद्धी आणि मांगल्याच्या या सणात अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात केली जाते. झी युवावरील गर्ल्स हॉस्टेल या हॉरर मालिकेतील सारा, प्रियांका, तन्वी , मालती , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा , बिना आणि वनिता या मुलींनीही आणि त्याचप्रमाणे त्यांची रेक्टर दुर्गा यांनी त्याच्या रोजच्या गडबडीच्या शेड्युल मधून वेळ काढत नऊ रंगाच्या साड्यांमध्ये फोटोशूट केले . आजचा दिवस माझा या कल्पनेने प्रेरीत होत ९ रंगाची उधळण करत आणि त्याच बरोबर इतर सुंदर रंग त्यात आणत गर्ल्स होस्टेलच्या मुलींनी फोटोशूटची धमाल अनुभवली. सध्या मालिकेत नेहा च्या मिसिंग केस बद्दल चौकशी सुरु असून पोलिसांना एक बॉडी सापडली आहे. गर्ल्स हॉस्टेल ही मालिका सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता झी युवावर पाहायला मिळेल.