गद्रे सी फूड आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असून यामुळे आता खवय्यांना नवी पर्वणी लाभणार आहे . दीपक गद्रे यांनी 1978 मध्ये स्थापना केलेली हि कंपनी गोठविलेल्या सागरी उत्पादनांवर प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिट करणारी कंपनी म्हणून प्रसिध्द आहे .1994 मध्ये भारतातील पहिला सुरमई उत्पादन प्रकल्प रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आला . गद्रे मरीन … तेव्हापासून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सुरमई मधील निर्मिती उद्योग मानला जातो .व्यवस्थापकीय संचालक श्री अर्जुन गद्रे यांच्या नेतृत्वाखाली मासे शिजविणे आणि साफ, कच्चे मासे कापून सुरमई मूल्यवर्धित उत्पादने बनवणे ती विकणे यात कंपनी अग्रेसर राहिली आहे . कोलंबी , लॉबस्टर बाइट, खेकडा आदी सागरी खाद्य पदार्थांचे विविध उत्पादने गद्रे मरीन प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने जपान, तैवान, मलेशिया, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया येथे मोठ्या प्रमाणात निर्यातकरण्यात येतात कंपनी सध्या 3 गुजरात आणि कर्नाटक सह रत्नागिरी येथे प्रकल्प चालवत आहे. यशस्वीरित्या परदेशात निर्यात केल्यानंतर, गद्रे यांनी आता भारतीय बाजारपेठेत लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.