श्री. गणेश जयंतीनिमित जय भवानी मित्र मंडळाच्यावर्तीने
विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी
श्री. गणेश जयंतीनिमित पुणे लष्कर भागातील सोलापूर बाजारमधील जय भवानी मित्र मंडळाच्यावर्तीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली .त्या निमित सकाळी होमहवन करण्यात आला तर त्यानंतर आरती करण्यात आली . यावेळी नगरसेवक विवेक यादव यांच्याहस्ते महाप्रसाद वाटप करण्यात सुरुवात करण्यात आली . यावेळी जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष रणवीर अरगडे , उपाध्यक्ष निलेश खरात , सचिव उमेश रेड्डी , कार्याध्यक्ष अजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते .
श्री. गणेश जयंतीनिमित राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्यावतीने
गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
श्री. गणेश जयंतीनिमित पुणे कॅम्पमधील क्लोव्हर सेंटरमध्ये राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेच्यावतीने पुणे कॅम्प मधील क्लोव्हर सेंटर मध्ये गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले . यावेळी होमहवन , महापूजा करण्यात आली . यावेळी महाप्रसाद वाटप राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष मंगेशदादा चंद्रमौर्य यांच्याहस्ते करण्यात आली . या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सचिन बोत्रे , रवि चव्हाण , सचिन कदम , अविनाश श्रुंगारपुरे , जय नारवाणी , विलास जिंदे , अशोक वाघचौरे , सलीम शेख आदींनी केले होते .
श्री. गणेश जयंतीनिमित सावतामाळी मित्र मंडळाच्यावतीने
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
श्री. गणेश जयंतीनिमित भैरोबानालामधील सावतामाळी मित्र मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी श्री चा अभिषेक , होम हवन , आरती आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले . रात्री संत सावतामाळी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . यावेळी सावतामाळी मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश सायकर , सुर्यकांत चौघुले , मनोज जांभुळकर , अनिल गवळी , सुनील लांडगे , नंदकुमार तेलगु , शाम जांभुळकर , पुंडलिक गवळी आदींनी केले .
श्री. गणेश जयंतीनिमित अशोक चक्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
श्री. गणेश जयंतीनिमित पुणे कॅम्प मधील डवायार लेनमधील अशोक चक्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी होमहवन , श्री ची आरती . महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . यावेळी अशोक चक्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ व प्रेमराज परदेशी व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
श्री. गणेश जयंतीनिमित स्नेहसवर्धंक युवक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवच्यावतीने
श्री गणेश जन्म सोहळा
श्री. गणेश जयंतीनिमित पुणे कॅम्प मधील सोलापूर बाजारमधील मानाचा पहिला गणपती स्नेहसवर्धंक युवक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा उत्साहात पार पडला . यानिमिताने विबिध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी होमहवन , पूजा , श्रीची आरती , महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .