पुणे:
‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्वरा हाऊसिंग ग्रुप’ या संस्थांच्या वतीने पिरंगुट येथे ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या दोन दिवसीय सांस्कृतिक, कला व चित्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पिरंगुटच्या निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक, कला व चित्र तसेच रॅपलिंग, झिपलाईन सारख्या विविध साहसी खेळांचे या उत्सवात आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत, अशी माह्तिी ‘गंगोत्री-ग्रीनबिल्ड’चे संचालक गणेश जाधव, मकरंद केळकर आणि ‘व्यंकटेश्वरा हाऊसिंग ग्रुप’चे संचालक वसंत बसाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ यामध्ये शनिवार 25 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत आषाढी वारीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेत चारुहास पंडीत ‘चिंटू गँग’ ची स्केचेस रेखाटणार आहेत.
रविवार 26 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळात सेलेब्रिटी गप्पा या कार्यक्रमात लेखक व अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्याशी बातचीत करण्यात येईल. दुपारी 4 ते 5 या वेळेत गायिका सायली पानसे आणि अपर्णा केळकर यांचा ‘अमृतघन’ हा वर्षाऋतु वरील संगीताचा कार्यक्रम होणार आहे. ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या उत्सवात लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांना सहभागी होता येईल.
या कार्यक्रमांबरोबरच शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रॅपलिंग, झिपलाईन, टॅटू, ‘चित्रांगण’- चित्रकला कट्टा, मेंदी, भुट्टा ऑन रुफ टॉप, तसेच व्हिंटेज कार सोबत फोटो काढण्याची संधी यावेळी मिळणार आहे.
सकाळी 9.30 पासून ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’योगेश्वरी सोसायटी,मेहंदळे गॅरेज रोड, एरंडवणे, पुणे येथून शटल बससेवा उपलब्ध आहे.
संपर्क: 88888 70222 , 88888 36564

