मुंबई – वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘गीता मेरा नाम’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘दुल्हा दुल्हन’, ‘हम दोनो’ अशा असंख्य चित्रपटांनी रसिकांच्या मनावर एकेकाळी मोहिनी घातलेल्या आणि आज हि त्यांच्या सिनेमात आणि गाण्यांमध्ये रमणाऱ्या रसिकांना धक्क्का देत बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांनी हिदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला . त्या ७४ वर्षांच्या होत्या.
साधना या ६०-७०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आपल्या केसांच्या स्टाईलने आणि देखण्या रूपाने त्यांनी तमाम रसिकंना मोहून टाकले होते त्यांनी जवळपास ३५ हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. . ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’, ‘आजा आई बहार दिल है बेकरार’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’ जी रुठ्कर अब कहा जाइयेगा… यांसारखी हिट गाणी त्यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती.
२ सप्टेंबर १९४१ हा त्यांचा जन्मदिवस . कराचीत जन्म झाला . १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंबीय मुंबईत आले त्यावेळी त्यांचे वय अवघ्या ६ वर्षांचे होते .
साधना शाळेत असताना नृत्य शिकण्यासाठी डान्सस्कूल ला जात . तिथे एके दिवशी एक नृत्यदिग्दर्शक आले आणि त्यांनी ग्रुप डान्स साठी राजकपूर यांना विद्यार्थिनी हव्या आहेत असे सांगितले . त्या फिल्मचे नाव होते’ श्री ४२० ‘तेव्हा खूप मेहनत घेवून मोठ्या आशेने साधना यांनी या ग्रुप डान्स मध्ये सहभाग घेतला . जेव्हा या सिनेमाची मोठमोठे पोस्टर मुंबईत झळकले तेव्हा मात्र … आपल्याला कोणी प्रीमियर ला बोलावीत नाही याची खंत वाटली आणि मी यासिनेमात डान्स केला हे त्यांनी मैत्रिणींना सांगितले होते . शेवटी त्यांनी स्वताच्या खर्चाने तिकिटे काढून मैत्रिणीसह त्या सिनेमाला गेल्या . गाणे होते .. रामय्या वता वैय्या …हे गाणे सुरु झाले आणि संपले हि .. पण साधना कुठे दिसली नाही.. एडिटिंग मध्ये साधनाचे शॉट कापले गेले होते .यावेळी मैत्रिणींपुढे शोभा झाल्याने साधनाला अक्षरशःरडू कोसळले होते
पुढे 1964 साली आलेल्या ‘दुल्हा दुल्हन ‘ या चित्रपटात साधना हि राज कपूरची नायिका होती