खो -खो सहित भारतीय खेळांना राजाश्रय ,समाजाश्रय हवा ! डॉ सतीश देसाई

Date:

index1
मुंबई :
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ :क्रीडा संस्कृती ,क्रीडा धोरण ‘ या विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्राचे खो खो चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि आता राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील नेतृत्व असलेले डॉ सतीश देसाई यांचे जोरदार भाषण मुंबईत झाले .

डॉ देसाई म्हणाले ,’ देशाचा संरक्षण मंत्री असतानाही यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या विजेत्या खो खो टीम बोलावून देशभर खो खो चा प्रसार करण्याचे प्रोत्साहन दिले आणि स्वत : मैदानात महाराष्ट्राच्या कर्णधाराला खो देवून  रस दाखवला !  शरद पवार यांनी बारामतीसह अन्यत्र खो खो स्पर्धा आयोजन करून खो खो पुढे नेला ,
असे नेते आणि राजाश्रय असण्याची आज आवश्यकता आहे
ते म्हणाले ,’ ज्या खेळात वेग आहे ,आणि तरी कुठे थांबायचे याचे भान सांगतो ,अशा खो खो खेळाचे पुनरुज्जीवन करायचे तर फार मोठे नियोजन करण्याची गरज आहे
३-३ वर्षे अर्जुन ,शिव छत्रपति पुरस्कार दिले जात नाहीत ,
राजकीय नेत्यांकडे २०-२० सदनिका शासनाच्या १० टक्के सवलतीत असताना ,खेळाडूना मिळत नसतील तर परिस्थिती भीषण आहे
रक्त ,घाम ,अश्रू  देवून खेळाडूंनी हा खेळ टिकवला . आता मोजके संघ वगळता इतरांची अवस्था बिकट आहे ,
पी एम आर डी ए सारख्या पुण्याच्या विस्तारित योजनेत जर खेळाला मैदाने नसतील ,राजकीय व्यवस्थेत जर खेळाची बाजू मांडणारे चाहते नसतील ,खेळाडूंना पेन्शन मिळाली नाही ,मैदानाबाद्द्दल प्रेम निर्माण झाले नाही ,खो खो मध्ये चौकात (खांबावर ) खेळण्याच्या आत्म्यावर नियमातून  निर्बंध आले , तर भविष्यात परिस्थिती अवघड होईल
सर्व सामान्य घरातील खेळाडूंनी हा खेळ पेलून धरला आहे ,आता, चांगल्या घरातील खेळाडू खो खो मध्ये पुन्हा येतील ,माध्यमांसह समाजातील सर्व घटक त्यांच्या खेळाची ,नोकरीची ,राहण्याची काळजी वाहतील ,क्रीडा धोरण वेळेत येवून त्याची अमलबजावणी होईल ,तेव्हा राज्यातील खो खो ला उर्जितावस्था येईल ‘
 या चर्चासत्रात भीष्मराज बाम,अंजली भागवत ,जया शेट्टी ,आदिल सुपारीवाला यांनी विचार मांडले
प्रतिष्ठान च्या वतीने सरचिटणीस शरद काळे ,हेमंत टकले यांनी विचार मांडले . शरद पवार यांच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित चर्चासत्र मालेत गुंफलेले हे सत्र आज सकाळी वानखडे स्टेडीयम गरवारे लाउंज मध्ये पार पडले .
 पद्माकर शिवलकर ,उमेश झिरपे ,प्रवीण ठिपसे ,चित्रा वाघ ,निलेश राउत ,आनंद परांजपे उपस्थित होते
विजय साळवी यांनी सूत्र संचालन केले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...