पुणे:
सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील सुदुंबरे हे गाव दत्तक घेतले आहे. या योजनेंतर्गत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 13 ते 19 जानेवारी दरम्यान संवाद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा शुभारंभ खा. वंदना चव्हाण, तहसीलदार शरद पाटील, सरपंच सौ. संगीता भांगे, उपसरपंच – बाळकृष्ण गाडे, ग्रामसेवक – शरद ढोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यामध्ये महिला सबलीकरण, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता, जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्ड चे वाटप, शेतकर्यांसाठी कांदा कार्यशाळा, हास्यषटकार हा मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच चामात्कारामागील विज्ञान हा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा कार्यक्रम घेण्यात आले.
या संवाद सप्ताहात पुण्यातील वंदन नगरकर यांनी महिलांना पालकत्व या विषयावर मागर्दर्शन केले तर संजीवनी जोगळेकर आणि नीला विद्वंस यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे दिले. यशस्वी संस्थेचे श्री. तुपे यांनी युवकांना रोजगाराच्या विविध संधी बाबतीत मार्गदर्शन केले तर श्री. विकास लवांडे यांनी युवकांना व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा विद्युत मंडळाचे सदस्य श्री. प्रवीण यांनी गावातील विजेच्या प्रश्नासंदर्भात गावकर्र्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रा. विवेक सांबारे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानिक दृष्टीकोन आणि बुवाबाजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुण्यातील श्री. मिलिंद हल्याळ यांनी हास्याचे षटकार मनोरंजनाचा कार्यक्रम सदर केला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेंगजे यांनी आरोग्य तपासणी शिबीर आणि जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्ड चे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. कोथिम्बिरे यांनी शेतकर्यांची कांदा उत्पादन या विषयावर कार्यशाळा घेतली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र्याच्या अधिकार्यांनी यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
श्रीराम टेकाळे, विजय दिवेकर आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.