दिल्ली :
दक्षिणेकडील महिलांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीबद्दल राज्यसभेत शुक्रवारी नाराजीचा सूर उमटला. महिलांवरील अत्याचाराच्या चर्चेदरम्यान बोलताना खासदार शरद यादव यांनी दक्षिण भारतीय महिलांच्या रंगाचा उल्लेख केला होता. महिलांवरील अत्याचार आणि रंग यांचा संबंध जोडण्याचा यादव यांचा प्रयत्न होता. ब्रिटिश डॉक्युमेंटरी महिला निर्मात्या गोर्या असल्याने त्यांना पटापट परवानग्या मिळाल्या असाही शेरा यादव यांनी मारला.
त्याबद्दल नाराजीच्या प्रतिक्रिया राज्यसभा सदस्यांनी माध्यमांकडे नोंदविल्या. ‘एनडीटीव्ही’च्या वेबसाईटने या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, अॅड. वंदना चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देताना ‘खासदार यादव यांचे विधान स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे.’