खासदार अॅड. वंदना चव्हाण जपान अभ्यास दौर्यावर
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि खासदार अॅड. वंदना चव्हाण पाच दिवसांच्या जपान अभ्यास दौर्यावर गेल्या आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज’ आयोजित दौर्यात 4 खासदारांचे शिष्टमंडळ तेथे गेले आहे. दि. 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2015 या दरम्यान हा दौरा आहे. या खासदारांसमवेत ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या दोन सदस्यांचा समावेश आहे.
भारत-जपान व्यापार आणि राजकीय संबंध या विषयावर चर्चा, भेटी, रेल्वे पर्यटन, वाहतूक सुविधांची पाहणी जपान संसदेला भेट, पर्यावरण विषयक बदलांवर जपानच्या उपाययोजनांची माहिती घेणे याचा अभ्यासदौर्यात समावेश आहे. भारत-जपान संवाद प्रकल्प या विषयावर हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहेत. त्यासाठी ‘सासाकावा पीस फाऊंडेशन’ ने निमंत्रण दिले आहे. खासदार व्ही. पी. सिंग बडनोर हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत.