खबरदार , देशद्रोही वक्तव्ये कराल ; हिंदुविरोधी चकार शब्द काढाल तर हा हिंदुस्तान आहे पाकिस्तान नाही- शिवसेनेचा एमआयएम ला पुण्यातील सभा उधळण्याचा इशारा

Date:

पुणे- खबरदार , देशद्रोही वक्तव्ये कराल ; हिंदुविरोधी चकार शब्द काढाल तर हा हिंदुस्तान आहे पाकिस्तान नाही अशा स्पष्ट शब्दात पुण्यातील शिवसेनेने ओवेसी ला इशारा दिला आहे त्या अनुषंगाने आपल्या भडकाऊ भाषणांसाठीच ओळखले जाणारे एमआयएमचे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन) नेते असदुद्दीन ओवेसी यांची पुण्यात होणारी सभा उधळण्याची धमकी शिवसेनेनं दिल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. ओवेसींनी हिंदूविरोधी चकार जरी काढला, तरी आम्ही तो सहन करणार नाही, त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा पवित्रा शिवसेनेनं जाहीर केलाय आणि विशेष म्हणजे याबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना शिवसेना शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी पत्र देवून अगोदरच सूचित केल्याचे वृत्त आहे
महाराष्ट्र कृती समिती आणि मुलनिवासी मुस्लिम मंचानं येत्या ४ फेब्रुवारीला पुण्याच्या गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषद आयोजित केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक मान्यवरांना आमंत्रित केलं असून त्यात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचाही समावेश आहे. मुस्लिम आरक्षण या विषयावर ते आपलं मत मांडणार आहेत. त्यामुळे पुण्यात सगळ्यांचेच कान टवकारले आहेत. चिथावणीखोर भाषणं करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचाच प्रयत्न ओवेसींनी अनेकदा केला आहे. हिंदूंना लक्ष्य करून मुस्लिमांना भडकवणारी भाषा ते सतत करताना दिसतात. त्यामुळे मुस्लिम आरक्षणावरचं त्यांचं भाषणही जहाल असू शकतं. हे ओळखूनच शिवसेना आक्रमक झाली आहे.
हिंदू जनतेच्या भावना दुखावतील, असं जळजळीत मत ओवेसी मांडू शकतात. तसं झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही. त्यांची आरक्षण परिषद आम्ही उधळून लावू आणि त्याला सर्वस्वी आयोजक जबाबदार असतील. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं खरमरीत निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी पोलीस आयुक्त सतीश माथूर यांना दिलंय. त्याची दखल घेऊन, ओवेसींच्या सभेदरम्यान शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यादृष्टीनं पोलिसांनीही पूर्ण तयारी केली आहे.
दरम्यान, मुस्लिम आरक्षण परिषदेचा कार्यक्रम हा राजकीय विषय नसून तिथे एकट्या ओवेसींचंच भाषण होणार नसल्याचं आयोजकांनी नमूद केलंय. न्या. बी जे कोळसे पाटील हे या परिषदेतील प्रमुख वक्ते आहेत, तर आम आदमी पार्टी, रिपब्लिक युवा मोर्चा, छावा युवा संघटनेच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षणाचा विषय सामाजिक आहे, धार्मिक तेढ निर्माण करायचा आमचा उद्देश नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसं असलं तरी, ओवेसींचा शब्द न् शब्द शिवसेना कान देऊन ऐकणार आहे आणि तो न पटल्यास आपल्या ‘स्टाइल’नं उत्तर देणार आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरणात तणाव जाणवतोय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारची जागा,सरकारचेच अब्जावधी रुपये अन शिवसृष्टी पाहायला ६०० रुपयांचे तिकीट: अबब किती लुटमार ?

पुणे- महापालिकेची शिवसृष्टी चांदणी चौकात होऊ दिली नाही त्या...

 पुढील ५ वर्षांत ६ हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य

‘यूएसटी’ने पुण्यात सुरू केले एक हजार आसन क्षमतेचे नवीन कार्यालय नवे कार्यालय ८०,००० चौरस...

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर अभिनेते सचिन खेडेकर

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत एखादा कलाकार कितीही...

२८ किलो गांजा मुंढव्यात पकडला

पुणे -पुणे पोलिसांनी एकूण १६लाख ८० हजार रुपये...