पुणे- शिक्षण क्षेत्रातही मोठ्ठ्या प्रमाणात स्थित्यंतरे आता अपेक्षित असून काही काळानंतर खडू आणि फळा इतिहासजमा होईल असे भाकीत शिक्षण तज्ञ पी ए इनामदार यांनी येथे केले .
महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव आणि संत नामदेव प्रशालेत संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते . शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड , यांच्या पुढाकाराने येथे एम एस सी आय टी चा कोर्स पूर्णपणे शिकविला जाणार आहे . शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरुद्दीन सोमजी , तसेच अश्विनी राऊत,नारायण शिंदे मनीषा चोरबोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .