————————————-
कसबा विधानसभा मतदार संघानंतर खडकवासल्यातही परिवर्तनाची लाट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येतो आहे खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार , महापौर दत्ता धनकवडे, युवक अध्यक्ष अजित बाबर पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष काका चव्हाण, माजी आमदार कुमार गोसावी पंचायत समिती सदस्य नितीन दांगट यांनी एकत्रितपणे केला आहे
पुणे महापालिका हद्दीलगच्या ३४ गावांमध्ये झपाट्याने नागरिकरण वाढले आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दिलीप बराटे यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून मोठे काम केले आहे. उत्तमनगर, कोंढवे -धावडे, शिवणे, कोपरे या गावांसाठी जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना पूर्ण करून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. शिवगंगा खोर्यातील व रांजणे, खामगांव, मावळ, मोगरवाडी, व घेरासिंहगड येथील वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रय▪करणार असल्याचेही दिलीप बराटे यांन यावेळी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवण झालेल्या सिंहगड किल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्यागाची व शौर्याची आठवण करून देणारे ‘स्वराज्य निष्ठा शिल्प’ उभारण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला विधानसभा मतदारसंघात खानापूर, नर्हे, धायरी, वडगांव खुर्द, कोंढवे आदी गार्डन व काकडे सिटी (वारजे) या ठिकाणी सबस्टेशनची ऊर्जा विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावण्यासाठी दिलीप बराटे यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगरपालिका हद्द व लगतच्या गावांमध्ये उड्डाणपूल, उद्याने, मोठे व प्रशस्त रस्ते, कचरा निर्मूलनासाठी बायोगॅस प्लॅंटची निर्मिती, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना, मतदारसंघात सुसज्ज असे रुग्णालय, ई – लर्निंग स्कूल, तंत्रशिक्षण, बिझनेस व कर्मशिअल हब, युवकांचे सशक्तीकरण तसेच बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बचत बाजार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही दिलीप बराटे यांनी सांगितले.
कोंढवे धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, शिवणे येथे दिलीप बराटे यांची पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारो नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितील यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी आमदार कुमार गोसावी, पुणे महापालिकेचे महापौर दत्ता धनकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदाताई वांजळे, शेखर दांगट पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन दांगट, कोंढवे धावडेचे उपसरपंच अतुल धावडे, माजी नगरसवेक शैलेश चरवड, सुरेशअण्णा गुजर, अहिरेगावचे माजी उपसरपंच सत्यनारायण आबा वांजळे, मारुती किंडरे, रमेश धावडे, गणेश धावडे, युवराज मोरे, माणिक मोकाशी, त्र्यंबक मोकाशी, विजय गायकवाड, बाळासाहेब दांगट या पदयात्रेत सहभागी झाले होते. दिलीप बराटे यांनी आज घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी बराटे यांना विविध समस्यांची जाणीव करून दिली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी एक दिलाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप बराटे यांचा प्रचार करीत आहेत.
खडकवासल्यातही लाट परिवर्तनाची
Date: