क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी होण्याबाबत मागणी पूर्ण करण्याकरिता समाज कल्याण आयुक्तांलय महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागाच्या कार्यालयासमोर अन्याय विरोधी आंदोलनाच्यावतीने ” आमरण उपोषण आंदोलन ” करण्यात आले .
अन्याय विरोधी आंदोलनाचे अध्यक्ष नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , माजी आमदार उत्तमप्रकाश कंधारे , अन्याय विरोधी आंदोलनाचे सचिव अशोक शेडगे , उपाध्यक्ष दादाराव देवकुळे , मधुकर चांदणे , विठ्ठल थोरात , सुरेश अवचिते , प्रकाश बगाडे , अनंत बगाडे , अशोक शेडगे , रमेश चांदणे , संतोष माने , अशोक लोखंडे , राजाभाऊ लोखंडे , अनिल जाधव , संभाजी शिंदे , अनिल हातागळे , भास्कर पाटोळे , सुरेखा खंडाळे व अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .
या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले . शासनाच्यावतीने मातंग समाजाच्या विकासासाठी क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी केलेल्या ८२ शिफारशीपैकी ६८ शिफारशीला राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देण्यात आलेल्या आहेत . शासनाने यासाठी संबधीत विभागांना जबाबदारी दिलेली आहे . याबाबत शासन निर्णय ३१ डिसेंबर २०११ रोजी झालेला असून शासनाने अध्यादेशही जारी केलेला आहे . परंतु महाराष्ट्र शासनाच्या जबाबदारी देण्यात आलेल्या विभागाकडून अंमलबजावणीस मोठा विलंब होत असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे हि बाब मातंग समाज बांधवासाठी अन्यायकारक आहे . तरी या शासनाच्यावतीने मातंग समाजाच्या विकासासाठी क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी अन्याय विरोधी आंदोलनाच्यावतीने ” आमरण उपोषण आंदोलन ” करण्यात आले .