क्रांतीचा डॅशिंग अंदाज

Date:

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. येत्या २० मे ला प्रदर्शित होणाऱ्या किरण कुलकर्णी V/किरण कुलकर्णी या चित्रपटात तिच्या अभिनयाची वेगळीच ‘क्रांती’ आपल्याला पहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या ‘स्टंटस्’ चे टास्क क्रांतीने अगदी लीलया केले आहेत. क्रांतीने नेमके असे कोणते स्टंट केले हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच. या चित्रपटात क्रांतीने चक्क ट्रक चालवला आहे. एवढंच नाही विहिरीत पोहणं असो की पॅराग्लायडिंग या स्टंटचाही रोमांचकारी अनुभव तिने यामध्ये घेतला आहे. तसेच सापासोबतच एक थरारक दृश्यही तिने यात साकारलं आहे.

ट्रक चालवणं, विहिरीत पोहणं, पॅराग्लायडिंग या सर्वांसाठी क्रांतीने रीतसर ट्रेनिंग घेतलं. त्याचं टेक्निक जाणून घेत हे स्टंटस् केले. ताप असतानाही विहिरीत पोहण्याचा सीन क्रांतीने जिद्दीने पूर्ण करत कलेप्रती असलेली बांधिलकीच जपली. हे स्टंट करणे माझ्यासाठीही तितकेच रोमांचकारी असल्याचं सांगत किरण कुलकर्णी V/किरण कुलकर्णी हा चित्रपट माझ्यासाठी वेगळा अनुभव असल्याचं क्रांती आवर्जून सांगते.

किरण कुलकर्णी V/किरण कुलकर्णी  या सिनेमाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांचं आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचं असून संकलन आनंद दिवान यांचं आहे.  कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत. २० मे ला किरण कुलकर्णी V/किरण कुलकर्णी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...