पुणे, दि. 23 : महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा बंद पडल्याने मंगळवारी (दि. 23) कोथरूड
विभागातील कोथरूड, वारजे, डेक्कन आदी परिसरातील 50 टक्के भागात सकाळी 8.40 ते 11 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता
याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या फुरसुंगी उपकेंद्गातून 132 केव्ही वाहिनीद्वारे कोथरूड विभागात
वीजपुरवठा करण्यात येतो. तथापि आज सकाळी न्याती परिसरात मृत पक्षी या वाहिनीच्या विद्युत बाधीत क्षेत्रात
आल्याने वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड विभागात होणारा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी 9.22 पर्यंत
डेक्कन व कोथरूड परिसरातील 50 टक्के भागात एनसीएल व गणेशखिंड उपकेंद्गातून पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात
आला. दरम्यान महापारेषणकडून पावसामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून 132 केव्ही वाहिनीची पाहणी करण्यात आली
व सकाळी 11 वाजता ही वाहिनी कार्यान्वित झाली. सोबतच कोथरूड विभागातील सर्व परिसरात वीजपुरवठा सुरळीतझाला अशी माहिती महावितरण ने कळविली आहे