कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या वर्धापन दिनानिमित मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले . कसबा पेठेतील सावतामाळी भवनमधील साभागृहात झालेल्या या नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन प्रसिध्द नेत्रविशारद डॉ परिक्षित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कॉसमॉस बँकेच्या कसबा पेठ शाखेच्या व्यवस्थापिका प्रमिला लांडे , उपव्यवस्थापक किशोरी बडदे , सावतामाळी भवनचे व्यवस्थापक संतोष रासकर , भूषण मोडक , सुधाकर शिंदे , मंजुषा दलाल , अश्विनी चव्हाण , धनंजय देशपांडे , तुळशीराम खळदकर , सुनिल ढोलेपाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नेत्र तज्ञ डॉ. मिनाज इनामदार , डॉ. जोसेफ एलिझाबेथ आदींनी नेत्र तपासणी केली . दोनशे जणांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला . यावेळी बँकेचे खातेदार , नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली .