ऐतिहासिक कॉंग्रेस भवनाच्या अमृतमहोत्सवानिमित पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने पुणे कॅम्प भागात ” प्रभात फेरी ” काढण्यात आली . या प्रभातफेरीची सुरुवात ईस्ट स्ट्रीटवरील व्हिक्टरी टोकीजपासून करण्यात आली . पुढे इंदिरा गांधी चौक , वोल्गा चौक , खाण्या मारुती चौक , ट्राय हॉटेल चौक , महात्मा गांधी रोड , १५ ऑगस्ट चौक , मोहम्मद रफी चौक , कोहिनूर हॉटेल चौक , महावीर चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रभात फेरीची सांगता झाली .
या प्रभात फेरीमध्ये पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , विश्वजित कदम , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , नगरसेवक अविनाश बागवे , रमेश अय्यर , संगीता तिवारी , नगरसेविका लता राजगुरू , लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , मुख्तार शेख , असिफ शेख , सुजित यादव , केविन मेनवेल , विठ्ठल थोरात , क्लेमंट लाझरस , विनोद सोलंकी , अरुण गायकवाड , सादिक लुकडे , अझीम गुडाकुवाला . इस्माइल चौधरी , संगीता पवार , मंजूर शेख , मधुकर चांदणे , वाल्मिक जगताप , बाळासाहेब घोडके . लतेन्द्र भिंगारे व मोठ्या संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ध्वज , डोक्यावर पांढरी टोपी घालून सार्वजन सहभागी झाले होते . यावेळी देशभक्तीपर गाणी गाण्यात आली .