पुणे, ता. 22 : राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाने कैलास स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी केली. मंगलमय वातावरणाची निर्मिती करणारे सनईचे सूर, नेत्रदीपक आकर्षक, भव्य रांगोळी, आसमंत उजळून टाकणारा पाच हजारहून अधिक पणत्यांचा झगमगाट आणि सेवकांसाठी मिठाई व भेटवस्तूंचे वाटप असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते.
महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त संदीप ढोले, आरोग्य निरीक्षक नीलिमा काकडे, रूबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे, इंडियाआर्टचे संचालक मिलिंद साठे यांची प्रमुख उपस्थिती. या वेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ससूनच्या शवागारातील कर्मचारी व स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक ह्द्य सन्मान करण्यात आला. मंदार रांजेकर, अतुल सोनावणे, नीलेख राखुंडे, विकास मापुसकर, मंगेश तडके, सचिन देसाई, यशवंत नेटके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.