पुणे— रसिकांनी भरलेले श्री गणेश कला क्रीडा रंगमंच… ६० ते ८० च्या दशकातील हिंदी गाण्यांच्या आविष्कारात
तल्लीन झालेले रसिक… त्याचवेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांची सपत्नीक झालेली एन्ट्री…पुणे नवरात्रौ
महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी पालकमंत्र्यांच्या सुप्तगुणांची करून दिलेली ओळख, यामुळे
रसिकांनी गाणे म्हणण्याचा त्यांना आग्रह केला आणि आबा बागुल व रसिकांच्या आग्रहाखातर पालकमंत्र्यांनी ‘के पग
घुंगरू बांध, मीरा नाचीथी..’, या गाण्याला सुरुवात करताच रसिकांनी रंगमंच शिट्या व टाळ्यांनी डोक्यावर घेतले.
पुणे नवरात्रौ महोत्सावंतर्गत सौरभ दफ्तरदार दिग्दर्शित ‘रंगीलारे’ हा ६० ते ८० दशकातील हिंदी चित्रपट गीतांच्या
कार्यक्रमाचे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सोमवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आले होते. जुन्या काळात घेवून
जाणाऱ्या या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांनी शिट्या, टाळ्या वाजवत व वन्समोअर करत दाद दिली.
‘कौन है जो सपनो मे आया….’, ‘जवानी जाणे मन, हसीन दिलरुबा..’, ‘बच के रहेना रे बाबा… बच के रहेना रे…’,
‘रंगीला रे….’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर…’, ‘ओ हसीना झुल्फोवाली जाने जहा…’, ‘आजा, आजा, मै
हु प्यार तेरा…’, ‘निले निले अंबर पर, चांद जब आये…’, ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी…’, ‘छोटीसी उमर मे लग
गया रोग…’, ‘सारा जमाना…हसिनोका दिवाना..’, ‘प्यार हमे इस मोड पे ले आया..’, अशी एकापेक्षा एक सरस गीते
त्याच बरोबर ‘डान्सिकल परफॉर्मन्स’ने रसिकांना घायाळ केले. सौरभ दफ्तरदार, पालवी बापट, सई टेंभेकर, संदीप
उबाळे या कलाकारांनी गीते गायली.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्यासह या कार्यक्रमाच्या वेळी भेट दिली. पुणे
नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष, उपमहापौर आबा बागुल, पोलीस उपायुक्त संजय पाटील,माजी नगरसेवक सुहास
कुलकर्णी, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल हे यावेळी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, पक्ष, जात, पंथ या पलीकडे जाऊन प्रेम करणारा व सामाजिक बांधिलकी जपणारे आबा बागुल हे
व्यक्तिमत्व आहे. आरंभशूर अनेकजण असतात मात्र,आबा बागुल हे ज्याच्यातून दुसऱ्याला फायदा होईल व दुसऱ्याला
आनंद होईल असे उपक्रम सातत्याने राबवत असतात.
यावेळी बोलताना आबा बागुल यांनी ते राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गिरीश बापट यांच्यातील सुप्त
गुणांची माहिती देताना ते गाणे चांगले म्हणतात असे सांगत त्यांनी बापट यांना गाण्याचा आग्रह केला. रसिकांनीही
त्यांची री ओढत गाणे म्हणण्याचा आग्रह बापट यांना केला.
सौ. गिरीजा बापट यांनी ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके..’, हा देवीचा मंत्र म्हटला आणि गिरीश बापट यांनी संत
मीराबाई यांच्यावर अनेक गाणे, भजन आहेत, नवरात्रौ महोत्सव असल्याने त्यांच्यावरचे गीत सादर करतो असे सांगत
‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘‘के पग घुंगरू बांध, मीरा नाचीथी..’ हे गीत सादर केले. त्यांनी माईक हातात घेवून ‘
बुजुर्गोने…बुजुर्गोने फर्माया की अपने पैरो के उपर खडे होके दिखलाओ…’, असे म्हणताच संपूर्ण रंगमंच शिट्या आणि
टाळ्यांनी दणाणून गेला.
यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,
रमेश भंडारी, राजू बडगे, अमित बागुल, सागर आरोळे, श्रीकांत बागुल, राजेंद्र बागुल हे उपस्थित होते.