पुणे-
वीजहानीचे योग्यरितीने निर्धारण आणि कृषिपंपाच्या वीजवापराचे मूल्यांकन करण्यासाठी म.रा.वि.म. सूत्रधारी कंपनीने
त्रिसदस्यीय समिती गठित केली असून या समितीने कामकाजास सुरुंवात केली आहे. ही समिती दि. 31 डिसेंबर 2015
पर्यन्त आपला अहवाल सादर करणार आहे.
राज्य शासन कृषिपंपधारक ग्राहकांना परवडेल अशा दराने वीजपुरवठा करण्यासाठी वीज देयकात लक्षणीय
अनुदान देते. कृषिपंपाचा जोडभार व वीजवापर जास्तीचा दाखवून त्याद्वारे वीज वितरण हानी नियंत्रित करण्यात येत
असून कृषिपंपाचा एकूण वीजवापर वाढविण्यात आला आहे. वीज चोरीच्या माध्यमातून वीजहानीची भरपाई केली जात
आहे. अशा प्रकारचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या बाबींचा अभ्यास करूंन त्यावर उपाययोजना
सूचविण्यासाठी सूत्रधारी कंपनीने तज्ञांची त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे.
या समितीचे अध्यक्ष श्री. विश्वास पाठक असून या समितीत वीज ग्राहक संघटनेचे श्री. प्रताप होगाडे व आशिष चंदाराणा
यांचा समावेश आहे. या समितीद्वारे महावितरणकडून कृषिपंपांना दिला जाणारा वीजजोडभार व वीजबील पध्दतीचा
अभ्यास केला जाणार आहे. तसेच नमुना म्हणून निर्धारित करण्यात येणार्या 100 कृषिवाहिन्यांची प्रत्यक्ष पाहणी
करण्यासाठी त्रयस्थ संस्थेच्या नियुक्तीची शिफारस करण्यात येणार आहे. या त्रयस्थ संस्थेच्या कामकाजावरही ही
त्रिसदस्यीय समिती देखरेख ठेवणार आहे.