खडकमाळ आळी येथे राहणाऱ्या किशोरी शिरीष बोराटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ५५ वर्षाच्या होत्या . त्यांच्यामागे पती , मुलगी , मुलगा , सून , नातू असा परिवार आह . पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अड. निलेश शिरीष बोराटे यांच्या त्या मातोश्री होत्या .
त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी नगरसेवक अविनाश बागवे , शिवाजीराव खेडेकर , खडकमाळआळी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदू थोरात , अड. सुधीर निरफराके , अभय छाजेड , माजी आमदार कमल ढोलेपाटील , माजी महापौर कमल व्यवहारे , सर्व पक्ष , सामाजिक संस्था चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .