Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

किशोरदा यांनी मला जगण्याचे मोठे बळ दिले: लीना चंदावरकर -लीनाजीनी लिहिलेल्या ‘सपने बनाता हूँ या अल्बमचे उद्या प्रकाशन

Date:

leena leena2 leena3

पुणे: एरव्ही मरण्याचे नाटक करणारे माझे पती जेव्हा १३ ऑक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा मला वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्‍चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले. त्यांच्या प्रेरणेनेच मी गीतकारही झाले, अशी कृतज्ञ भावना १९७०च्या दशकातील हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय नायिका लीना चंदावरकर यांनी व्यक्त केली.
गुलमोहोर कन्स्ट्रक्शन आयोजित हार्मोनी पुणे तर्फे ‘मैने कुछ खोया है, मैने कुछ पाया है’ या कार्यक‘मात लीनाजी यांनी त्यांच्या सुपरहिट सिनेमातील काही निवडक गाणी सादर करण्यात येत आहेत. त्यात ढल गया दिन, गम का फसाना, जाने क्यो लोग महोब्बत करते है, इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. लीना चंदावरकर यांच्याबरोबर होत असणार्‍या या गप्पांच्या मैफिलीत त्यांचा स्वत:चा तसेच किशोरदांबरोबरचा जीवनप्रवास त्या सांगणार आहेत, असे आयोजक व गायक मकरंद पाटणकर यांनी सांगितले. पाटणकर यांच्यासह या कार्यक‘मात अली हुसेन, सुवर्णा माटेगावकर, मेधा चांदवडकर गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजन विवेक परांजपे यांचे असून या कार्यक‘माचे निवेदन आर. जे. स्मिता करणार आहेत.

धारवाड येथील आपले बालपण ते वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ‘मन का मित’ या सिनेमातील काम करण्यापासून ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी विवाह, किशोर कुमार यांच्याशी दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच  प्रसारमाध्यमांशी कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू र्आँखो देखा हाल त्यांनी कथन केला.
किशोरदांचे निधन झाल्यानंतर १९९० पासून आपण गीतकार झालो. गीत लिहिताना ते जणू मला प्रॉमटिंग करताहेत असे वाटते, असे लीना चंदावरकर म्हणाल्या. कुमार ब‘दर्स मीडिया (केबीएम)तर्फे ‘बाबा मेरे’ आणि आता ‘सपने बनाता हूँ’ हा लीनाजींचा दुसरा म्युझिक अल्बम बुधवारी यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात संपन्न होत आहे. या अल्बममध्ये एकंदर १० गाणी असून त्यातल्या अमीत कुमार यांनी गायलेल्या एका गाण्याचे दृकश्राव्य प्रदर्शन यावेळी करण्यात येईल, असे पाटणकरांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...