नाशिक -नाशिक मधील अंबड येथील किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, या कंपनीत ९६४५ रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. ही पगारवाढ पुढील तीन वर्षांसाठी असून, सामंजस्य वेतनकरारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने आर. आर. देशपांडे यांनी, तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेश पाटील, जनरल सेक्रेटरी अशोक उशीर, यांनी स्वाक्षरी केली. यामुळे दिवाळीपूर्वीच कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.
९,६४५ रुपयांची सीटीसी पगारवाढ, त्या व्यतिरिक्त पेड हॉलीडे एकने वाढविण्यात आला आहे, कामगारांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली असून डी.ए. पॉइंटमध्ये ०.१ पैशाने वाढ, रिटायरमेंट गिफ्ट रक्कमेत २,५०० रुपयांची वाढ तर एल.एस.एम.बी. योजना नवीन लागू करण्यात आली आहे. मयताच्या वारसास ५० हजार रुपयांची मदत यावर्षीपासून व्यवस्थापनाने दिली आहे. मुला-मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपये विवाहकर्ज म्हणून देण्याची योजना, हजेरी बक्षीस योजनेमध्येही वाढ करण्यात आली आहे.
युनियन आणि व्यवस्थापनाच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शंतनु धर, शीतल कोठारी, कृष्णा गावडे, मंदार पराशरे, मकरंद देवधर, तर युनियन कमेटीकडून अध्यक्ष महेश पाटील, सेक्रेटरी अशोक उशीर, सहसचिव विजय कुलकर्णी, खजिनदार अरुण जाधव यांनी सहभाग घेतला होता. कामगार विकास मंचचे माेलाचे मार्गदर्शन युनियनला करारासाठी मिळाल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.
किर्लोस्कर मध्ये पावणेदहा हजाराची पगारवाढ
Date:

