नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का बसला असून, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे.
भाजपचे सदस्य असलेले आणि बेदी यांच्या प्रचाराची धुरा संभाळणाऱ्या टंडन यांनी बेदींना लक्ष्य करत राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यांनी बेदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आपल्याला अनेकवेळा बेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अशी वागणूक मिळाल्याचेही टंडन यांनी सांगितले.
टंडन हे भाजपचे गेल्या 30 वर्षांपासून सदस्य होते. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे.
भाजपमध्ये येताच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून किरण बेदींची पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवड करताच त्यांच्यात हुकुमशाहींचा दर्प चढला असल्याचा आरोप करीत टंडन यांनी अमित शहा यांना पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, मी गेली 30 वर्षे भाजपचा सदस्य असून गेली दहा वर्षे पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करीत आलो आहे. मात्र, किरण बेदींसोबत काम करणे मला कठीन जात आहे. त्यांचा व्यवहार व वागणे-बोलणे ठीक नाही. बेदींचे सहकारी प्रत्येक बाबतीत माझा अपमान करीत आहेत. गेल्या दहा दिवसापासून बेदी ज्याप्रमाणे नेत्यांना, पदाधिका-यांना डिक्टेट करीत आहे त्या वातावरणात मला काम करणे अवघड जात आहे. मी केलेले आरोप कोणतेही सनसनाटी करण्यासाठी केले नसून पक्षाला तसे वाटल्यास त्यांनी मी केलेल्या आरोपांची चौकशी करावी असेही टंडन यांनी म्हटले आहे.

याआधी दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनीही किरण बेदी यांच्या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.