शानदार मिरवणुकीने साधू-महंतांचे तीर्थस्थळी आगमन झाले. भाविकांनी शाहीस्नान पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. साधू-महंतांच्या स्नानानंतर भाविकांनी कपिलधारा तीर्थ येथे पावन स्नान केले. पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी श्री रामनारायणदास फलहारी महाराज आणि भाविकांशी संवाद साधला. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.
जि.प.अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार छगन भुजबळ, आमदार निर्मला गावीत यांनीही शाहीस्नानाच्यावेळी साधू-महंतांची भेट घेतली. भाविकांसाठी एसटी महामंडळाने खास बसची व्यवस्था केली होती. प्रशासनाने या सोहळ्यासाठी आवश्यक तयारी केली होती. भाविकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.