पुणे, : वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीजवापराची नोंद थांबविणार्या चोरीचा दुसरा
प्रकार महावितरणने उघडकीस आणला. नांदेड येथे कमोदिनी आईस प्लँट या बर्फ तयार करणाच्या कारखान्यात रिमोट
कंट्रोलद्वारे होणारी वीजचोरी आढळून आली. या कारखान्यात तब्बल 1 लाख 91 हजार 918 युनिट्सच्या 26 लाख 98
हजार 970 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 14) फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की नांदेड येथील सर्व्हे क्र. 10/11/1/अ मधील मे. कमोदिनी आईस प्लँट हा बर्फाचा कारखाना
वीजग्राहक इंद्गजित बाबासाहेब घुले यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत अद्यावत तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून केलेल्या विश्लेषणातून संशय निर्माण झाला. त्यामुळे कारखान्यातील वीजयंत्रणेची तपासणी करण्यात आली.
सदर कारखान्यात असलेल्या वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार केल्याचे आढळून आले. सिटी सर्कीटमध्ये फेरफार करून त्यात
रिमोट कंट्रोल सर्कीट समाविष्ट केल्याचे दिसून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे
मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून आले. रिमोट कंट्रोलचे सर्कीट अत्यंत छुप्या
पद्धतीने लावल्यानंतरही महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांनी या वीजचोरीचा छडा लावला. गेल्या 22 महिन्यांच्या
कालावधीत मे. कमोदिनी आईस प्लँटमध्ये 1,91,918 युनिट्सच्या 26 लाख 98 हजार 970 रुपयांची वीजचोरी झाल्याचे
सदर कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक
अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. उदय चामले, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त
कार्यकारी अभियंता श्री. दिलीप कोकणे, श्री. विजय सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता शिवलिंग बोरे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ शैलेश
बनसोडे, राम पवार आदींनी योगदान दिले.
वीजचोरीप्रकरणी कमोदिनी आईस प्लँटचे मालक इंद्गजित बाबासाहेब घुले विरुद्ध बुधवारी (दि. 14 ऑक्टो.) रास्तापेठ
(पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फोटो नेम व ओळ – Power Theft Detected 16/10/2015/वीजचोरीसाठी वीजमीटरच्या यंत्रणेत
छुप्या पद्धतीने रिमोट कंट्रोल सर्कीट बसवून केलेल्या वीजयंत्रणेची पाहणी करताना मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे,
अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे व महावितरणचे अभियंता. (फोटो इमेल केला आहे.)