लातूर – काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या. हरामाचा माल गरिबांकडे येण्याची हीच वेळ आहे. लक्ष्मीपूजनाअगोदरच लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचारातून पैसा कमवला व जमवला असल्याने ते धन जरूर घ्या; पण मतदान भाजपच्या उमेदवारांना करा, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी निलंगा येथील सभेत केले. सोनिया गांधींवर टीका करताना त्यांची भाषा मात्र घसरली.
गडकरी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्या ही राज्याची ओळख झाली आहे. राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज आहे. ७० हजार कोटींचा खर्च होऊन सिंचनाऐवजी मंत्र्यांचे खिसे ओले झाले.सोनिया आयी हे, रोशनी लायी है, असा नारा देणारी सोनियाही गेली व रोशनीही गेली आहे, अशी टीका नितीन गडकरी यांनी या वेळी केली सरकार आणा, राज्य लोडशेडिंगमुक्त करू २४ तास वीज देऊ. खताच्या किमती ५० टक्क्यांनी कमी करू. २५ लाख बेकारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.