काँग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार विनायक निम्हण यांच्या प्रचारासाठी खडकी येथे महिला मेळाव्याचे, काँग्रेस भवन येथे वकील मेळाव्याचे आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खेळाडूंच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विनायक निम्हण यांच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
वकील मेळाव्यात बोलताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड़ विकास ढगे-पाटील यांनी सांगितले की, शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी न्यायालय, भारती भवन येथे कौटुंबिक न्यायालय, मार्केट यार्ड येथे सहकार न्यायालय, वाकडेवाडी येथे कामगार न्यायालय असून, ही सर्व न्यायालये एकत्र आणण्यासाठी विनायक निम्हण यांचा राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू असून, त्याला नक्कीच यश येईल. यावेळी अँड़ विजयराव सावंत मुस्लिम अँड़ असोसिएशनचे अध्यक्ष अँड़ शाहीद अख्तार, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड़ मिलिंद पवार, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सनी निम्हण, अँड़ विजयराव सावंत, संजय बालगुडे, अँड़ एकनाथ जावीर, अँड़ चंद्रशेखर घाटे, अँड़ फय्याज शेख आदींसह ५00 हून अधिक वकील मेळाव्याला उपस्थित होते.
पुणे विद्यापीठ, कमला नेहरू उद्यान, हनुमान टेकडी आदी ठिकाणी विनायक निम्हण सपत्नीक सायकलवरून व्यायामासाठी येताना आम्ही पाहतो. आम्हा ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस करून विकासाचे मला कोणतेही काम सांगा, मी ते करणारच असे विश्वासाने सांगणारे विनायक निम्हण हे कार्यक्षम असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य विवेक कदम यांनी सांगितले. यावेळी काका धर्मावत, शिवा मंत्री, भाऊसाहेब रानवडे, हिरामण बालवडकर आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठ, कमला नेहरू, हनुमान टेकडी आदी ठिकाणी नियमितपणे फिरायला येणार्यांच्या गाठीभेटी घेतल्या.