पुणे-टेम्पो आणि झायलो मोटारीची सामोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जन ठार तर पाच गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (गुरुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास कान्हे फाटा येथील सूर्या ढाब्यासमोर झाला. सर्व जखमींवर सोमाटणे येथील बडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत भाऊसाहेब भानुदास घोडके, सुभाष सोपान भसावे, त्रिंबक खाडे (सर्व रा. पाथर्डी, जि. नगर) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. राजेंद्र चिमाजी भसावे, कृष्णा भगवान घोडके, भाऊसाहेब रामा मुंडे, गोपीनाथ निवृत्ती घोडके, पार्वती अदिनाथ भसावे, अर्चना खाडे,मच्छिंद्र कारभारी घोडके आणि एक दिड वर्षांचा मुलगा (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. पार्थर्डी, जि. नगर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरहून आलेली झायलो मोटार (एमएच ०४ ई एक्स १३४६) मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान टेम्पो (एमएच १४ जीजी ७०६५) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास कान्हे फाटा येथील सूर्या ढाब्यासमोर आले असता भरधाव वेगातील टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो थेट रस्ता दुभाजक ओलांडून झायलोसमोर आला. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने टेम्पो आणि झायलो मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जन ठार तर पाच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील बडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.