पुणे-कात्रज -मांगडेवाडी येथील ‘तिरंगा साईदीप ‘ या कुख्यात लॉज वर अखेर पोलिसांनी छापा टाकला .. वेश्याव्यवसाय चालविल्याच्या आरोपावरून इथे नौकरीसाठी नेपाळहून आलेल्या दोघांना पिटा कायद्याखाली अटक केली आणि एका सज्ञान मुलीची सुटका करून येथील कारवाई पूर्ण करण्यात आली .
विष्णू निम्लाल घोसल (वय २१ – रा -सध्या येथे लॉजवरच मुळगाव -छापा – जिल्हा – शेगदा; नेपाल ) हा इथे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता आणि नेपाळचाच इथे वेटर म्हणून काम करणारा गंगाप्रसाद निल्प्रसाद शर्मा (वय -५६ ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे .
गेली कित्येक वर्षे कात्रज परिसरातील हॉटेल लॉजवर वेश्याव्यवसाय आणि बेकायदा दारू विक्रीचा व्यवसाय चालतो . पहाटे ५ वाजेपर्यत इथले हॉटेल डबल ते चारपट किमतीत दारूविक्री करीत असतात . सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी गणेश जगताप यांना येथी या लॉजबद्दलची माहिती मिळाली . त्यांनतर अप्पर पोलीस आयुक्त सी एच वाकडे ,उप आयुक्त पी आर पाटील , किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली


