पुणे-शहराच्या आसपास आणि उपनगरांमध्ये आणि त्या नजीक दिसेल ती मोकळी जागा बळकावणे आणि ताबा मारणे अशा असंख्य घटना घडत असून यामागे राजकारणी नेते आणि अधिकाऱ्यांची मोठ्ठी साखळी कार्यरत असून अशा भूखंडांचे लोणी खाण्यासाठी नेते -अधिकारी यांच्या संगनमताने प्रत्येक ठिकाणी तरुणांना खेचून गुंडांच्या टोळ्या उभ्या करीत असल्याचे चित्र आहे . दरम्यान कात्रज -कोंढवा परिसरातील भूखंड जबरदस्तीने बळकावून आठ लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली .तर अन्य दोघे फरार आहेत . मात्र यांच्या मागे कोणी नेते -अधिकारी यांची साखळी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे .
संदीप बाळासाहेब नरोडे (वय ३४ -रा.स्मृती हाइट कात्रज ), मिलिंद मारुती जगताप (वय ४७ रा. पर्वती दर्शन )झिया अहमद बागवान (वय२५, गोकुळनगर, कात्रज ) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून बापू नायर आणि अभिजित नायर आणि अन्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही . सर्वे नंबर ४६ , हिस्सा नंबर ४३/४४ कोंढवा बुद्रुक येथे असलेली बोपोद्तील एका २७ वर्षीय तरुणाची जागा या आरोपींनी बळकावली . तिथे बेकायदेशीर ताबा ठोकून पत्र्याचे शेड मारून जागा मालकालाच येथे येण्यास मज्जाव केला . आणि जागा परत हवी असेल तर जीवे मारण्याची धमकी देवून ८ लाखाची खंडणी मागितली . १० नोव्हेंबर पासून हा पराक्र सुरु होता . या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन एन अतकरे हे करीत आहेत


