पुणे- कांद्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणा या मागणीसाठी शहर कॉंग्रेसने… रात्रीच्या काळोखात झगमगाटात उजळून पुण्याची शान बनू पाहणाऱ्या मंडई समोर आज दिवसा अनोखे आंदोलन केले .
ज्या कांद्याचे सर्वत्र वांदे झाले आहेत असे कांदे … नव्हे कांद्याच्या माळा गळ्यात घालून केल्याने हे अनोखे आंदोलन बनले . अर्थात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला भाव वाढीबाबत दुषणे देत कांद्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणा अशी मागणी यावेळी करण्यात आली .
शहराध्यक्ष अभय छाजेड , महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा कमाल व्यवहारे , रोहित टिळक , संजय बालगुडे , अरविंद शिंदे, नीता परदेशी , बाळासाहेब मारणे , बाळासाहेब दाभेकर , मिलिंद काची , राजेंद्र भुतडा ,मंद चव्हाण , मुकारी अलगुडे , शेखर कपोते , विनोद निनारीया , मधुकर राऊत, राजा महाजन ,सुधीर काळे , मंदा चव्हाण आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .