अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुंपली

Date:

अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात निवडणूक रिंगणात चांगलीच जुंपली आहे , पहा अजित पवार काय म्हणतात आणि पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात …
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या रडारवर सध्या पृथ्वीराज चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले आहे . काँग्रेसच्या जाहीरातींबाबत प्रश्न उपस्थित करून अजित पवार म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जेवढी जाहीरातबाजी केली नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने विधानसभा निवडणुकीत केली जात आहे. मराठीतील कोणतेही टीव्ही चॅनल सुरु केले तर, फक्त पृथ्वीराज चव्हाण सही करताना दिसतात. तीन वर्षात त्यांनी कधी फायलींवर सह्या केल्या नाही आणि जाहीरातीत मात्र त्यांनी स्वतःला कामाचा निपटारा करताना दाखवले आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी मंजूरी दिलेल्या फायलींची चौकशी केली पाहिजे, त्यातून ते किती क्लिन आहेत हे उघड होईल.’ असा आरोप अजित पवारांनी केला.
‘काँग्रेसकडे एवढी जाहीरातबाजी करण्यासाठी फंड कुठून आला,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाताजाता त्यांचे दहा दिवसांपूर्वीचे सहकारी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित संचिन घोटाळ्याच्या चौकशीला मंजूरी दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस चव्हाणांना टार्गेट करत आहे. आघाडी सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यात झालेल्या फायलींची चौकशी झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तर, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीनंतर भाजप सोबतच्या युतीच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.
निव्वळ भाषणबाजी नको – थेट माझी चौकशीच करा – पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
आघाडीचे सरकार चालवत असताना माझ्याकडून नियमबाह्य अथवा चुकीचे निर्णय झालेले नाहीत. ते झाले असतील तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून द्यावे, माहितीच्या अधिकारात माहिती घ्यावी अन् त्याची बिनधास्तपणे चौकशी करावी, असे जाहीर आव्हान देताना चुकीच्या विरोध करीत आक्षेप घेत सत्यतेचे धोरण घेतल्याने हितसंबंध दुखावलेले लोक राजकीय स्वार्थापोटी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असा आरोप हि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
गुरूवारी कराडहून मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, चुकीचे निर्णय आणि धोरण बदलल्यामुळे हितसंबंध दुखावलेले लोक माझ्यावर रोष व्यक्त करत आहेत. म्हणूनच अशा लोकांकडून माझ्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. आपणाकडून निर्णय घेताना, घाई गडबड अथवा चुकीचे काम झालेले नाही. , असे ठणकावून सांगताना यापूर्वी निर्णय घेताना विलंब लागला म्हणून ओरड करत होते. आता लवकर कामे झाली म्हणूनही ओरड करायची, ही अजित पवारांची खेळी लोक चांगले जाणून आहेत त्यास जनता भुलणार नाही असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये छुपी युती झाल्यामुळे दोन्ही पक्ष आपल्यावर खोटे आरोप करून आपल्या खात्याच्या कामकाजासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,. नगरविकास खाते हे माझ्या अख्त्यारित असणारे खाते असल्याने त्याबाबतचे निर्णय मीच घेतले आहेत. ते घेताना कोणताही निर्णय आपण घाई गडबडीत घेतला नाही.नगरविकास खात्याच्या ४0 हजार फाईल्स आपण क्लिअर केल्या असून न्याय व सार्वजनिक हिताचे निर्णय आपण कधीच थांबवले नसल्याचे सांगितले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना त्यांची पात्रता काय? त्यांच्या सर्टिफिकेटची आपणास गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी झाल्यानेच
राष्ट्रपदी राजवट — पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी झाल्यानेच राष्ट्रपदी राजवट महाराष्ट्रात आणली गेली हे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , राज्यपालांनी मला काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्याचे पत्र दिले आणि काही तासातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मला काही अधिकार मिळू नये म्हणूनच भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने राज्याला राष्ट्रपती राजवटीखाली ढकलले. याचा फायदा होईल, असे पवार यांना वाटले असावे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला आहे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चितळे समितीने पवार व तटकरे यांना क्लीन चिट दिली. पण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने दोघांच्या चौकशीचे आदेश दिले. ही फाइल अनेक दिवसांपासून पडली आहे. गृह विभागाने ती पाठवलीच नव्हती. आता निवडणूक काळात ती माझ्याकडे येईल व मंजूर होईल, अशी भीती दोघांना होती, असे चव्हाण म्हणाले. टोल धोरणावरही त्यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले खारघरचा टोल मी दिला का? १५ किमीमध्ये दोन टोल करणे हे कुठले शहाणपण? इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी झाली तेव्हा मी नव्हतो. एकदा कंत्राट दिले की ते थांबवता येत नाही. प्रस्ताव आला तेव्हा त्यांना ठाऊक नव्हते का १५ किमीमध्ये दोन टोल लावता येत नाहीत. चुका करतात आणि मला दुरुस्त करायला सांगतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...