नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये सन 1995 मध्ये जन्म झालेला नावेद ने पाचवीमधून शाळा सोडल्यानंतर छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. वडील मारत असल्यामुळे घरातून तो पळाला आणि दहशतवादी बनला . मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याने ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण घेतले होते त्याच ठिकाणी पाकिस्तानचा दहशतवादी कासीम खान ऊर्फ महंमद नावेद याने प्रशिक्षण घेतले आहे, अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान उधमपूर हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहंमद नावेद हा पाकिस्तानी नागिरकच असल्याची माहिती उघड झाली आहे. “मीच तो नावेद चा दुर्दैवी बाप आहे,” अशी कबुली मोहंमद याकूब या पाकिस्तानी नागरिकाने कुबली दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानचा दहशतवादी नावेदला जिवंत पकडण्यात आल्यानंतर पाकिस्तानातील मानशेरा येथे लष्कराच्या शिबीरामध्ये प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानमधून 2 जून रोजी चौघांनी भारतात प्रवेश केला होता. नोमान, ओकाश पख्तून व मोहम्मद भाई अशी तिघांची नावे आहेत. काश्मीरमधील स्थानिक दुकानदारांनी आपल्याला मदत केल्याचे नावेदने चौकशीदरम्यान सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानमध्ये सन 1995 मध्ये नावेदचा जन्म झाला आहे. पाचवीमधून शाळा सोडल्यानंतर छोट्या-मोठ्या नोकरया केल्या. वडील मारत असल्यामुळे घरातून तो पळाला होता. सन 2014 मध्ये जमात उद दावा या दहशतवादी संघटनेमध्ये तो सहभागी झाला. लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये काश्मीरशी संबंधित व्हिडिओ दाखविले जात होते. काश्मीरमध्ये मुस्लिमांची संख्या कमी होत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे काश्मीरविरुद्ध लढण्यास तयार झालो, अशी माहिती नावेदने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.तर दुसरीकडे त्याचे पिता याकुब यांनी , ‘मला मारून टाकतील. लष्कर-ए-तैयबा आमच्या मागावर आहे, आणि पाकिस्तानी लष्करही आमच्या मागावर आहे,‘ असे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. अटकेतील दहशतवादी नावेद याने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर त्याच्या वडिलांनी पंजाबी भाषेत संवाद साधत वरील कबुली दिली. ‘तुम्ही भारतातून कॉल करीत आहात. आम्हाला मारून टाकतील. मीच तो दुर्दैवी बाप,‘ असे याकूब यांनी सांगितले. ते बोलताना उदासीन व घाबरलेले होते. ‘लष्कर-ए-तैयबा आमच्या मागावर आहे. हल्ला केल्यावर त्यामध्ये नावेद (भारतात) मारला जावा, आणि जिवंत सापडू नये अशी त्यांची इच्छा असेल. कृपया त्याला सोडा,‘ असेही ते म्हणाले.
कसाब व नावेदने घेतले एकाच ठिकाणी प्रशिक्षण-नावेद पाकिस्तानी नागिरकच पित्याकडे झाली शहानिशा
हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने नावेद याच्या पाकिस्तानातील कुटुंबाशी थेट संपर्क साधल्यावर ही माहिती उघड झाली.