———————————————
कसबा विधानसभा मतदार संघात लाट आहे पण ती नरेंद्र मोदी यांची नाही तर परिवर्तनाची लाट आहे , या मतदार संघात कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांच्या प्रचाराने चांगलीच रंगत आणली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी काल कसबा विधानसभा मतदार संघातून अनेक जुन्या इमारतींबाबत अभ्यास करून जुन्या वाड्यांचा प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. येथे लाट आहे पण ती परिवर्तनाची आहे आपल्या उमेदवारीमुळे येथील प्रश्न आता रेंगाळत पडणार नाही तर वेगाने सुटतील अशी आशा मतदारांच्या कडून व्यक्त होते आहे असे यावेळी मानकर यांनी सांगितले
त्यांच्या प्रचारानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारपेठ येथून सुरू झालेली पदयात्रा केसरीवाडा, नारायण पेठ, मोदी गणपती, मुंजोबाचा बोळ, चित्रशाळा चौक, प्रभात प्रेस, माती गणपती येथील गुप्ते मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी दीपक जगताप, भगवान पालकर, दत्ता सागरे, सुरेश बांदड, कैलास कांबळे, रजनी पाचंगे, घारेताई व अनेक स्थानिक गणपती मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. पुणे शहरातील बोहरी समाजाचे धर्मगुरू अब्देअली भाईसाहब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून मानकर यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. धर्मगुरू अब्देअली भाईसाब यांनी मानकर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला. कसबा विधानसभा मतदारसंघात शनिवार, नारायण व सदाशिव पेठेमध्ये मोठय़ा प्रमाणावर जुने वाडे आहेत. गेली अनेक वर्षे विविध कारणांमुळे त्यांचा विकास झालेला नसून, मोडकळीस आलेले हे वाडे धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वाड्यांचा विकास साधताना भाडेकरू व मालक या दोघांचाही समन्वय साधून विकास करण्याबाबत मानकर यांनी दिशा दिली. आपण लवकरच भाडेकरू व मालक यांच्याशी समन्वय साधणार असून यातून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल, अशी मला आशा आहे. वाडा मालकांचे नुकसान होऊ न देता विकसकांना जादा एफएसआय देवून या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे गृहप्रकल्प उभारणीला माझे प्रोत्साहन राहील. ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूचा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. राज्य व केंद्र शासनाच्या जाचक अटींमुळे हा विकास रखडला असून, पुरातत्व विभागाकडे आपण या अटी शिथिल करण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले. विकास करताना मात्र पुण्याची ओळख असणारी वाडासंस्कृती जतन करून विकास करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून येथील नागरिक जीव मुठीत घेवून राहत आहेत. त्यांना आतातरी आपल्या हक्काचे घर मिळावे, याकरीता मी प्रयत्न करणार आहे
कसब्यात लाट आहे पण … परिवर्तनाची
Date: