पुणे:कविता म्हणजे फक्त भावना नसून ती एक देणगी आहे, ज्याला व्यक्त होता आल तो नशीबवान असतो. म्हणुन कविता हे कवीला दृष्टी लाभलेली कला आहे. असे प्रतिपादन कवी सागर काकडे यांनी केले. शाई प्रतिष्ठान द्वारे तारांगण पिंपरी चिंचवड येथे आयोजीत सहित्यकेसरी काव्य करंडक २०२४-२५ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून साहित्य केसरी काव्य करंडक ही स्पर्धा आयोजिली जाते. यावर्षी महाराष्ट्रभरातून एकशे पन्नास पेक्षा जास्त स्पर्धकांनी यावेळी स्पर्धेत सहभाग घेतला. तिसऱ्या व अंतिम फेरीसाठी तीस स्पर्धकांची निवड झाली.
दरम्यान या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस.आय विकास अडसूळ, युवा वक्ते अक्षय इळके, व्याख्याते विवेकानंद पाटील, उद्योजक गणपत शेठ टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून कवी सागर काकडे व प्रा. अमोल चिने उपस्थित होते. शाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बनसोडे, उपाध्यक्ष महेश होनमाने यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढविले.
कवी प्रमोद घोरपडे, ऐश्वर्या नेहे, गजानन साबळे, पार्थ भेंडेकर, अक्षय तेलोरे, नवनाथ पाटोळे, गौरव पुंडे, निखील सुक्रे आदींनी परिश्रम घेतले.
विजेत्यांची यादी:
प्रथम क्रमांक – वैशाली तायडे, बुलढाणा
द्वितीय क्रमांक – सचिन चव्हान, अहिल्यानगर
तृतीय क्रमांक- पंकज गवळी, नाशिक
विशेष लक्षवेधी- चैताली कापसे, नाशिक
उत्तेजनार्थ प्रथम – निलेश तुरके, यवतमाळ
उत्तेजनार्थ द्वितीय – सिद्राम सोळंके, बीड
- पिपल चॉईस अवार्ड *
प्रथम क्रमांक – कोड क्रमांक – १
विद्या जाधव, पुणे
द्वितीय क्रमांक – कोड क्रमांक – २५
नयन कांबळे, कोल्हापूर
तृतीय क्रमांक – कोड क्रमांक – २२