पुणे-कर्नाटक राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दहा महापालिका आयुक्त,१६ मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ वरिष्ठ अभियंते, दोन पर्यावरण अधिकारी यांनी शैक्षणिक दौऱ्या अंतर्गत पुणे महापालिकेस भेट दिली.
कर्नाटक राज्यातील सिटी मॅनेजर्स असोसिएशन यांचे वतीने शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करणेत आले होते.
पुणे महानगरपालिकेतील मा. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया यांनी अभ्यास दौऱ्यातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच मनपाच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख अभियंता विवेक खरवडकर यांनी शहरातील विविध रस्ते, पूल, पथ विभागातील विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. अधिक्षक अभियंता व्ही.जी. कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा, श्रीमती किशोरी गद्रे व अरुण खिलारी यांनी घनकचरा व्यवस्थापन, राहूल जगताप यांनी ई-गव्हर्नन्सबाबत, उपायुक्त सुहास मापारी यांनी करआकारणी व करसंकलनाबाबत, श्रीमती उल्का कळसकर यांनी अंदाजपत्रकासंदर्भात माहिती दिली.
मनपाच्या विविध प्रकल्पांच्या भेटी अंतर्गत शिष्टमंडळाने वाडिया महाविद्यालया समोरील माता रमाबाई भिमराव आंबेडकर उद्यानास भेट दिली. बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यात आलेल्या या उद्यानांची पहाणी करीत असता येथील अधिकारी अजय घाटगे यांनी सविस्तर माहिती दिली.
सहकारनगर येथील भारतरत्न राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथील भेटी प्रसंगी मुख्याध्यापक अरुण कामठे व योगिता पाटील यांनी येथील विविध उपक्रमांची माहिती दिली.
यशवंतराव चव्हाण उद्यान येथील चित्रमहर्षी दादासाहेब फाळके ‘‘फोर-डी”तसेच सेव्हन वंडर्स व कै. वसंतराव बागूल उद्यानातील भारतरत्न पंडित भिमसेन जोशी कलादालन व नाला उद्यानाची पाहणी केली.
रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील रोकेम प्रकल्पास (वेस्ट टू एनर्जी) भेट दिली असता येथील व्यवस्थापक योगेश देशपांडे व अविनाश गावडे यांनी सविस्तर माहिती दिली.
वरील प्रकल्पांची पाहणी करित असताना अभ्यास दौèयातील अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करुन माहिती घेतली. तसेच सर्व प्रकल्पांची प्रशंसा केली.
अभ्यास दौèया अंतर्गत कर्नाटक राज्यातील सागर, झमखांडी, श्रीरंगपटण, qसधूर, इलकल, निप्पानी, बसव कल्याण, राणी बेन्नुर, गोकाक, कोप्पाल या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त तसेच महाqलगपुरा, अथनी, वाडी, उल्लाळ, इंडी, अन्नीगेरी, के.आर.पेट, आळंद, सौदंसी, qचचोळी, सुल्लिया, कोप्पा, हिरेकेरुर, देवानहळ्ळी, हलिएल, मधुगिरी, रॉबर्ट सोनपेट, या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व सिटी मॅनेजर्स असोसिएशन कर्नाटक या संस्थेतील अधिकारी यांचा अभ्यासदौऱ्यात सहभाग होता.





