पुणे शहरात कचरा व्यवस्थापन उत्तम पद्धतीने व्हावे व नागरिकांनी ओला व सुका कचरा विभाजन करून ठेवावा, जेणे करून महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनामध्ये हि ओला सुका कचरा वेगळा वेगळा देता येईल या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये सोसायटी, बंगले व नागरिकांना पांढर्या व हिरव्या रंगाच्या बकेट कचरा साठवण्यासाठी दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी या बकेट चा वापर कचरा सोडून इतर कारणांसाठी केला जातो.
शासनाच्या महानगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमावली मध्ये या संदर्भात स्पष्ट सब्दात मार्गदर्शन करण्यात आल आहे. त्यामध्ये या बकेट कशा असाव्यात याचे ‘डिझाईन’ देखील देण्यात आले आहे. परंतु पालिकेच्या वतीने पुन्हा जुन्याच बकेट खरेदी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. लाखो रुपये खर्च करून घेतल्या जाणार्या या बकेट नियमावली मध्ये नमूद केल्या प्रमाणेच असाव्यात.
तसेच रस्त्यावर ठेवण्यात येणारे कंटेनर हे बंद दरवाज्याचे असावेत असेही या नियमावली मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचे हि पालन पालिका प्रशासना कडून होताना दिसत नाही. या दोन्ही गोष्टी शासनाच्या महानगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमावली प्रमाणेच झाल्या पाहिजेत अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्येकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकी मध्ये नगरसेवक चेतन तुपे यांनीहि सदर बकेट नियमावली प्रमाणेच असाव्यात या साठी आग्रह केला.