खंडातील १० सर्वोच्च शिखरे आनंद बनसोडेच्या नेतृत्वाखाली केली सर… प्रथम भारतीय टीम होण्याचा मान.
“वर्ल्ड पीस सेव्हन समिट” मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलिया मधील “ऑसी १०” हे गिर्यारोहणातील आव्हान पूर्ण.
भारताचा एव्हरेस्टवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याने सुरु केलेल्या “वर्ल्ड पीस सेव्हन समिट” या मोहिमेतील चवथे खंड ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसिस्को व इतर १० सर्वोच्च शिखरे नुकतेच सर करण्यात आले. २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर च्या दुपारपर्यंत आनंदच्या नेतुर्त्वाखाली भारतातील ८ जणांनी हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियातील १० सर्वोच्च शिखरे “ऑसी-१० आव्हान” हे पूर्ण करणारी पहिली भारतीय टीम असा मान या टीम ला मिळाला असून यासोबत इतर अनेक रेकॉर्ड यांच्या नावे झाले आहेत.या टीम मध्ये आनंदसहित मुंबई व पुणे येथील शरद व अंजली कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, दिनेश राठोड व तारकेश्वरी भालेराव ही जोडपी व दिल्ली येथील आकाश जिंदाल, मुंबई मधून संजना दलाल , औरंगाबाद येथील मनीषा वाघमारे, जयपूर येथील साची सोनी या मुलीही या भारतातील प्रथम “ऑसी- १०” या आव्हानात्मक मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.या मोहिमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आनंदने “युनायटेड नेशन्स वूमन” च्या “हीफॉरशी” या “स्त्री-पुरुष समानता” या विषयावर असलेल्या मिशनचा प्रसारासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत टीम मधील इतर सर्वांनी स्त्री-पुरुष समानतेची शपत शिखराच्या सर्वोच्च उंचीवर घेतली.आनंदने ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरावरही भारताचे राष्ट्रगीत वाजवले असून ४ खंडाच्या सर्वोच्च उंचीवर राष्ट्रगीत वाजवणारा जगातील एकमेव गिर्यारोहक बनण्याचा मान त्याला मिळाला आहे.
आनंदचे गुरु सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदने या भारतातील प्रथम मोहिमेची आखणी केली होती. या अंतर्गत अनेक बाबतीत आगळ्या वेगळ्या ठरलेल्या या मोहिमेत ३ जोडप्यांचा समावेश या टीम मध्ये केला गेला होता.
आनंद बनसोडे यांच्याकडून झालेले विविध रेकॉर्ड-
1. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च दहा शिखरे “ऑसी-१०” हे आव्हान पूर्ण करणारा गिर्यारोहक व प्रथम भारतीय टीमचे नेतृत्व.
2. आनंद व जयपूरच्या साची सोनी हिने भारताचा सर्वात मोठा तिरंगा ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च उंचीवर नेहून एखाद्या शिखरावर सर्वात मोठा तिरंगा फडकवला.मान.
3. माउंट एव्हरेस्ट (१९ मे २०१२), माउंट एल्ब्रूस (१७ जुलै २०१४) व माउंट किलीमांजारो (१५ ऑगस्ट २०१४) व माउंट कोसिस्को (२ नोव्हेंबर २०१४) हे चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर.
4. एव्हरेस्ट, माउंट एल्ब्रूस, माउंट किलीमांजारो व माउंट कोसिस्को वर भारताचे राष्ट्गीत गिटारवर वाजवून जागतिक रेकॉर्ड.
5. भारताच्या संविधानाची प्रस्तावना ऑस्ट्रेलिया खंडाच्या सर्वोच्च शिखरावर प्रथमच आनंद मार्फत गेली.
6. युनायटेड नेशन्स च्या हिफॉरशी या मिशनच्या प्रसारासाठी आनंदने केली मोहिमेची आखणी.
यांनी केले “ऑसी-१०”आव्हान पूर्ण-
आनंद बनसोडे (टीम लीडर), साची सोनी, अंजली व शरद कुलकर्णी, श्रीकांत व रुपाली चव्हाण, मनीषा वाघमारे, आकाश जिंदाल.
महाराष्ट पोलीस दलातील जवान-
सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस दलातील दिनेश राठोड व तारकेश्वरी वाघमारे यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील ५ सर्वोच्च शिखरे सर केली असून असे करणारे ते महाराष्ट्रातील प्रथम पोलीस ठरले आहेत.
याशिवाय मुंबई येथील संजना दलाल हिने ३ सर्वोच्च शिखरे सर केली आहेत.
पुढील मोहीम –
आनंद आता पुढे दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणार आहे.
पुढील १० शिखरे सर केली –
१. माउंट कोसिस्को
२. माउंट टाउनसेंड
३. माउंट त्वानाम
४. माउंट राम्सहेड
५. माउंट इथररिज
६. माउंट राम्सहेड नॉर्थ
७. माउंट आलिस रोव्सोन पीक
८. माउंट अब्बोट पीक
९. माउंट साउथ वेस्ट ऑफ अब्बोट पीक
१०.माउंट कॅरुथर पीक