भारताचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने पूर्ण केलेल्या ऑसी-१० या ऑस्ट्रेलिया खंडामधील १० सर्वोच्च शिखराची चढाई मोहीम नुकतीच पूर्ण केली आहे. या मोहिमेमुळे आनंद ने नेतृत्व केलेली टीम ही १० शिखरे सर करणारी पहिली भारतीय टीम बनली आहे. या शिवाय आनंद ने शिखरावर राष्ट्रगीताची धून वाजवून विक्रमही केला आहे.अनेक बाबतीत विशेष ठरलेल्या या मोहिमेचे कौतुक भारतीय राजदुतावासाकडून केले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या कैनबेरा येथील भारतीय राजदुतावासाकडून आनंद व त्याच्या टीम चे कौतुक केले असून टीम ला चहा-पाण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. भारताचे ऑस्ट्रेलियातील उपउच्चायुक्त सुरिंदर दत्ता यांनी भारतीय दुतावासात आनंद व त्याच्या टीम ला बोलावून त्यांचे अभिनंदन केले.
आनंद व टीममधील इतर १० सदस्यांनी ऑसी-१० हे आव्हान स्वीकारून पूर्ण केल्या बद्दल ऑस्ट्रेलियातील प्रमाणित कंपनीचे प्रमाणपत्रही आनंद व टीमला उपउच्चआयुक्त श्री.सुरिंदर दत्ता यांच्या हस्ते दिले गेले. या वेळी गिर्यारोहणातील अनेक प्रश्न विचारून श्री. दत्ता यांनी टीमला पुढील कामगिरीसाठी सुब्बेछां दिल्या. टीमसोबत खूप वेळ गप्पा मारून आपुलकीने विचारपूस केली. युनायटेड नेशन्स च्या “हिफॉरशी” मिशनद्वारे जागतिक पातळीवर स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत हि मोहीम आनंदने केली गेली. “ऑसी-१०” हे १० शिखरांचे आव्हान दिल्ली येथील “मिशन आउटडोअर” कंपनीद्वारे आयोजित केली गेली होती.
“मी करत असलेल्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरांच्या जागतिक शांततेसाठीच्या मोहिमेच्या चवथ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाने केलेले कौतुक म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण होता. या मोहिमेसाठी युनायटेड नेशन्सच्या नोराह नेको यांनी दिलेली संमती व उपउच्चआयुक्त श्री सुरींदर दत्ता यांनी केलेल्या कौतुकाने या मोहिमेकडे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मोहीम आहे असे मला वाटत आहे. आता असेच देशाचे नाव उंचावत ठेवण्याची जबाबदारी हजारो पटीने वाढली आहे.”