पुणे- शहरातील सार्वजनिक शौचालयाचे निर्धारीत उद्दिष्ट व वैयक्तिक शौचालयाच्या कामाच्या पूर्तता अशा
दोन्ही स्तरावरुन पुणे शहरातील शौचालय मान्य निधीतील उद्दिष्टांचे काम पूर्ण करुन पुणे शहर हागणदारी मुक्त
केले जाईल असे घनकचरा विभागाचे उप आयुक्त श्रीमती किशोरी गद्रे यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. पंतप्रधान मा. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छ
भारत अभियाना कार्यक्रमा प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता
अभियान रॅली प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की स्वच्छता अभियाना अंतर्गत ४/७/२०१५ रोजी
वस्त्या व शाळांमधील शौचालये सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणामध्ये उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शहर
स्वच्छताकृती आराखडा तयार करण्यात आला असून २/१०/२०१७ पर्यंत पुणे शहर हागणदारी मुक्त करणेकरिता
२८५७२ वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २/१०/२०१४ ते २/१०/२०१५ अखेर १३८५
वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झालेली आहेत. या योजने अंतर्गत लाभाथ्र्यांना बाधंकाम साहित्य उपलब्ध करुन
देण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी सस्ंथा व कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून वस्ती पातळयांवरील शौचालये दुरुस्ती
व नुतनीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेतील सभासद, अधिकारी, कर्मचारी वर्ग, नागरिक, स्वयंसेवी संस्था,
विद्यार्थी अशा विविध स्तरावरुन स्वच्छते विषयी कार्यक्रम घेत आहेत.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग विक्रेते व्यावसायिक यांच्यावर सातत्याने कारवाई
करण्यात येत असून प्रशासकीय शुल्क वसूल केले जात आहे. तसेच अभियान कालावधीत ४ कला पथकांच्या
सहाय्याने शहरातील सर्व परिसरात पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शहरातील ९५ ठिकाणच्या
दिशादर्शक कमानींवर स्वच्छता संदेश देणारे जाहिरात फलकांद्वारे प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे. शहराच्या
विविध ठिकाणी संगीत, सांस्कृतिक, प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमाद्वारे कचरा
विलगीकरण व स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने जनजागृती केली जाणार असल्याचे घनकचरा विभागाच्या उप आयुक्त
श्रीमती किशोरी गद्रे यांनी सांगितले.

